मुंबईनंतर ठाण्यात कोरोनावरील ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा काळाबाजार

५४०० रुपये किंमतीला मिळणारे इंजेक्शन ही टोळी बाजारात २५ ते ८० हजार रुपयांना विकत होती.

मुंबईनंतर ठाण्यात  कोरोनावरील ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा काळाबाजार
SHARES

मुंबईनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने  कोरोना(Coronavirus pandemic)वर प्रभावी मानलं जाणारं रेमडेसीवीर इंजेक्शन (Remedesivir injection)चा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ५४०० रुपये किंमतीला मिळणारे इंजेक्शन ही टोळी बाजारात २५ ते ८० हजार रुपयांना विकत होती. अरुण रामजी सिंग ,सुधाकर शोभीत गिरी, रविंद्र मोहन शिंदे, वसीम अहमद अब्दुल अहमद शेख, अमीताब निर्मलदास अशी या आरोपींची नावे असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथका(Thane Anti- Extension Squad)चे पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.


ठाण्यात(Thane) सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. असे असताना बाजारात नागरिकांची दिशाबूल करत त्यांची लूट केली जात आहे. कोरोनावर सध्या कोणतेही औषध नाही. अशा परिस्थित सध्या ‘रेमडेसिवीर’ हे औषध प्रभावी माणले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला बाजारात मोठी मागणी आहे. या इंजेक्शनची बाजारात किंमत ही ५४०० रुपये इतकी आहे. मात्र काही भूरट्या चोरांकडून या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला असल्याची माहिती  ठाण्याचे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. हे आरोपी इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी तीन पेट्रोल पंप, नौपाडा पोलिस ठाणे(Naupada Police Thane) परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार  पोलिसांनी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा रचून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांच्या चौकशीतून  या काळाबाजार करण्यात सहभागी असलेल्या दोन जणांना पोलिसांनी कामोठा परिसरातून अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ५ लाख १८ हजार ५०० रुपये किंमच्या वस्तू हस्तगत केल्या आहेत.

हेही वाचाः- अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्य सरकारच्या निर्णयानंतर ही...

राज्यात करोनावरील रेमडेसीवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे. याची दखल राज्य सरकारनंही घेतली होती. काळाबाजार रोखण्यासाठी रेमडेसीवीर औषध घेण्याकरिता आधारकार्ड (Aadhaar card) सक्तीचं करण्यात आलं होतं. रेमडेसीवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले होते. ज्या रुग्णांना रेमडेसीवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे, त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे औषध घेण्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहितीही कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे (Cabinet Minister Rajendra Shingane) यांनी दिली होती.

हेही वाचाः- आॅनलाईन अभ्यास घेताना घ्या ‘ही’ काळजी, नाहीतर अकाऊन्ट होईल साफ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा