भाजीवाल्याकडे सापडले 2 कोटींचे ड्रग्ज!

Mumbai Airport
भाजीवाल्याकडे सापडले 2 कोटींचे ड्रग्ज!
भाजीवाल्याकडे सापडले 2 कोटींचे ड्रग्ज!
See all
मुंबई  -  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भाजी विक्रेत्याकडून 2 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त केल्याची माहिती उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरेशकुमार नागराजन (32) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो क्वालालंपूर येथे जात असताना हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.


'त्या' पिशवीत होते ड्रग्ज...

शुक्रवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरेश नागराजन मलेशियाला जात असताना त्याच्या बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याचे आढळले. ऊर्नी नावाच्या स्निफर कुत्रीने बॅगेत काही संशयास्पद अंमलीपदार्थ असल्याचा सिग्नल देताच संशय बळावला. त्यानंतर सुरेशकुमार नागराजन याला विमानातून खाली उतरवून त्याच्या बॅगेची झडती घेतली. तेव्हा त्याच्या बॅगेच्या तळाशी अतिशय पद्धतशीरपणे लपवलेली दोन किलो वजनाची पिशवी हवाई गुप्तचर विभागाच्या हाती लागली. 

त्या पिशवीमध्ये असलेल्या पावडरचं नार्कोटिक्स किटने परीक्षण केल्यानंतर ते मेटाक्युलोन नावाचे अंमलीपदार्थ असल्याचे समजले. त्याची किंमत 2 कोटींच्या घरात असल्याचा दावा हवाई गुप्तचर विभागाच्या आधिकाऱ्यांनी केला आहे.

चेन्नई राहणारा हा सुरेश भाज्यांच्या दुकानात काम करत असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ त्याच्याकडे नेमके आले कुठून? आणि तो कुठे घेऊन चालला होता? याचा सध्या शोध सुरू असल्याचे हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरेशला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.हेही वाचा -

पुण्यातून सुमारे 100 कोटींचे एमडी जप्त

एमडी ड्रग्जसह एकाला अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.