मद्यविक्री रात्री दीडनंतर केल्यास २ वर्ष परवाना रद्द

नाईट लाईफबाबत अद्याप कोणतिही नियमावली नसल्यामुळे या संकल्पनेबाबत सुस्पष्टता यावी याकरिता पालिकेने नियमावली तयार केली आहे.

मद्यविक्री रात्री दीडनंतर केल्यास २ वर्ष परवाना रद्द
SHARES

पर्यावरण मंत्री (Minister of the Environment) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतील “नाईट लाईफ”(Night life)चा प्रयोग २६ जानेवारीपासून मुंबईतल्या ठराविक विभागात सुरू करण्यात आला असला. तरी मद्यविक्री (Alcohol)वरील बंधने मात्र कायम आहेत. रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास बार किंवा वाईन्स शाँपचा परवाना (License) दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे. तर मॉलसाठी चोवीस तास खुले राहण्याची परवानगी काढून टाकली जाणार आहे. सात ठळक मुद्यांच्या आधारावर पालिकेने याबाबत नियमावली बनवली आहे.

हेही वाचाः-म्हणून दाखल केला अभिनेता नसरूद्दीन शहाच्या मुलीवर गुन्हा

मुंबई (Mumbai) सुरू करण्यात आलेल्या नाईट लाईफ या संकल्पनेवरून अद्याप सर्व यंत्रणा आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नाईट लाईफबाबत अद्याप कोणतिही नियमावली नसल्यामुळे या संकल्पनेबाबत सुस्पष्टता यावी याकरिता पालिकेने नियमावली तयार केली आहे. पालिकेतील साहाय्यक आयुक्त आणि मुंबई चोवीस तास संकल्पनेचे नोडल ऑफिसर शरद उघडे यांनी ही नियमावली तयार केली आहे. पोलिस विभाग, पालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) यांच्या जबाबदाऱ्या, तसेच मॉल व मिल आणि थिएटर मालक यांच्या जबाबदाऱ्या काय असतील याबाबत ही नियमावली आहे. मुंबई चोवीस तास संकल्पनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील व पर्यटन वाढीस चालना मिळेल हा मुख्य हेतू आहे. मात्र त्याच बरोबर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. याबाबत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांनी ही नियमावली बनवलेली आहे.

 हेही वाचाः- मला हिंदूहृदयसम्राट बोलू नका, तो मान बाळासाहेबांचा- राज ठाकरे

कायदा व सुव्यवस्थेसाठी (Law and order)अनेकदा कारणीभूत ठरणाऱ्या मद्यविक्रीवर सध्या अनेक बंधने असून ती नाईट लाईफ संकल्पनेत कायम ठेवलेली आहे. मद्य मागवण्याची परवानगी मध्यरात्री १ वाजण्यापूर्वी द्यावी असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. आम्ही दीडनंतर मद्य विकत नाही, असे शपथपत्र बार मालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावे लागणार आहे, तशी जाहीर नोटीस बारच्या दर्शनी भागातही लावली जाणार आहे.  बार किंवा वाईन्स शाँपवाल्यांनी या नियमांचे उल्लघंन केल्यास २ वर्ष त्याचे परवाना रद्द केले जाणार आहेत.

हेही वाचाः- दोन झेंड्यांची गोष्ट, मनसे-शिवसेनेत खडाजंगी

नियमावलीतील काही ठळक वैशिष्टय़े

* मुंबई चोवीस तास संकल्पनेत सुरुवातीला मॉल, मिल कंपाउंड अशा स्वतंत्र प्रवेशद्वार असलेल्या अस्थापनांतील दुकाने व उपाहारगृह २४ तास खुली ठेवता येणार आहेत.

* दुकानदारांच्या इच्छेनुसार दररोज चोवीस तासांऐवजी रात्री उशिरापर्यंत किंवा फक्त शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी, सणाच्या दिवशी चोवीस तास दुकान सुरू ठेवता येईल.

* मॉल मालकांना जाहिरात करून सगळ्यांना समान बोधचिन्ह वापरून ग्राहकांना आकर्षित करता येणार आहे.

* मॉलमध्ये लाइव्ह संगीत कार्यक्रम करता येतील, मात्र त्याकरता तिकीट विक्री करता येणार नाही.

* लोकांनी या संकल्पनेचा लाभ घ्यावा म्हणून खरेदीवर सूट देता येईल.

* रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना अधिक मोबदला देता येईल.

* उपाहारगृहांना खाद्य महोत्सव भरवता येतील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा