कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यावर चोरांची नजर, चौघांना अटक

मृतांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून त्यातील पैसे चोरण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यावर चोरांची नजर, चौघांना अटक
SHARES

मुंबईत कोरोनाने आतापर्यंत ६१२९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना. मृतांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून त्यातील पैसे चोरण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शाफिक मेहबूब शेख, प्रित्येश उर्फ पिंटू बीपीनचंद्र  मांडलिया, अरशद सैय्यद, स्वप्नील ओगलेकर अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.

हेही वाचाः- बेस्टच्या प्रयत्नांना यश, १००० हून अधिक कर्मचारी बरे होऊन परतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरलेब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रभाव प्रॉपर्टीज लिमिटेड या नामांकित कंपन्यांनीच्या मालकाचा मृत्यू २० जून रोजी कोरोनामुळे झाला. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी ही वारसदार आहेत. मात्र त्याही एका दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार कंपनीचे मॅनेजर संभाळतात. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या मॅनेजरने कार्यालयातून महत्वाचे कागदपत्र गहाळ झाल्याची तक्रार जुहू पोलिस ठाण्यात दिली होती. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखा ११ कडे सुपूर्द करण्यात आला. मालकाच्या खात्यावर बक्कळ पैसा असल्याचे कळाल्यानंतर एका आरोपीने साथीदारांच्या मदतीने त्याच्या खात्यातील पैसे चोरण्याचा कट रचला. दुसऱ्या आरोपीने स्वतःचा फोटो डुप्लिकेट नंबर घेण्यासाठी आधार कार्डवर वापरला होता. तर तिसरा आरोपी परदेशातील बँकेत कामाला होता. मात्र लाँकडाऊनमुळे तो भारतात नुकताच परतला होता. त्याने ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या सर्व्हर आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार होता. जेणेकरून हा फ्रॉड परदेशातून केला गेला आहे, असं भासविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मात्र क्राइम ब्रांचच्या समय सुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचाः- पोलिसांना मिळणार हक्काचे घर

दोन कंपन्यांच्या बँक खात्याची माहिती आणि त्या कंपनीच्या मालकाची माहिती मिळवून चौघेजण त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ट्रांजेक्शनद्वारे रक्कम चोरणार होते. ज्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांच युनिट ११ चे पोलीस निरीक्षक चिमाजी आढावा यांना मिळाली. त्यांनी या संदर्भातली माहिती वरिष्ठांना कळवताच वरिष्ठांनी त्यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. पोलिस या चौघांच्याही हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. या चौघांनी ट्रांजेक्शनला सुरुवात केलीच होती की, तेवढ्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २५ जुलैला दहिसरमधील एका झोपडपट्टीमधून अटक केली. कंपनीचे महत्त्वाचे कागदपत्र चेक बुक आणि डॉक्यूमेंट गहाळ झाल्याची तक्रार कंपनीचे मॅनेजर ने जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

हेही वाचाः- मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

पोलिसांच्या तपासात या चौघांनी मयत इसमाच्या नावे एक फेक सिमकार्ड घेतले होते. मोबाईलमध्ये आणि इतर ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट ॲप डाऊनलोड केले होते. गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन ॲप डाऊनलोड केले होते. त्या मोबाईलमध्ये ट्रांजेक्शन करण्यासाठी लागणारा वन टाइम पासवर्ड देखील आला होता. मृत व्यक्तीचे बँकेशी लिंक असलेल्या राजिस्टर नंबरचा डुपलीकेट सिम मिळवण्यासाठी मृत व्यक्तीचे डुबलीकेट आधार कार्ड बनवून त्याच नंबरचे सिम मिळवले होते. जवळपास सर्व तयारी झाली असताना पोलिसांनी वेळीत या टोळीला रंगेहाथ पकडून त्यांचा कट उधळून लावला. हे चौघेही ठाण्यात राहणारे होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा