Advertisement

मुंबईत दिवसभरात १०३३ नवे रुग्ण, दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू

तर सोमवारी दिवसभरात १७०६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत दिवसभरात १०३३ नवे रुग्ण, दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज कोरोनाने २२७ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात १०३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ रुग्ण दगावले आहेत. तर २६ जुलै रोजी ५७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २५ जुलै रोजी एकूण ५२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे १०३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख१० हजार  १२९ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात १७०६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

राज्यात प्रथमच आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून आज ८७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- Ram Mandir: उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ ढोंगीपणा, विहिंपची टीका

आज निदान झालेले ७९२४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२७ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२१ (३९), ठाणे- २८० (४), ठाणे मनपा-२४२ (९), नवी मुंबई मनपा-३३२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३४३ (११),उल्हासनगर मनपा-९६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (५), मीरा भाईंदर मनपा-१०२ (१), पालघर-६४, वसई-विरार मनपा-१९१ (३), रायगड-२३० (२८), पनवेल मनपा-१७२ (१९), नाशिक-७० (३), नाशिक मनपा-१७९ (२), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-८२ (२), अहमदनगर मनपा-८७, धुळे-११ (१), धुळे मनपा-१४, जळगाव-३२६ (४), जळगाव मनपा-९३ (२), नंदूरबार-१२ (३), पुणे- १६७ (११), पुणे मनपा-११०४ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-६५६ (१५), सोलापूर-१८१ (२), सोलापूर मनपा-१२२ (१), सातारा-११५ (४), कोल्हापूर-२९७ (७), कोल्हापूर मनपा-११६ (१), सांगली-३७, सांगली मिरज कुपवाड मनपा-७० (२), सिंधुदूर्ग-१३, रत्नागिरी-१ (२), औरंगाबाद-४३ (१), औरंगाबाद मनपा-२६७ (४), जालना-२९, हिंगोली-१३ (१), परभणी-१, परभणी मनपा-२, लातूर-६६ (१), लातूर मनपा-४८ (१), उस्मानाबाद-२२ (१), बीड-३४ (२), नांदेड-६० (१), नांदेड मनपा-२० (१), अकोला-१२, अकोला मनपा-४, अमरावती-१७, अमरावती मनपा-३५ (१), यवतमाळ-६५, बुलढाणा-६२, वाशिम-१७, नागपूर-७४, नागपूर मनपा-११७ (२), वर्धा-९, भंडारा-१, गोंदिया-८, चंद्रपूर-४, चंद्रपूर मनपा-२, गडचिरोली-३, इतर राज्य ११ (१).


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा