वरळीच्या ओल्ड पासपोर्ट आॅफीसजवळ सिलेंडर ब्लास्ट

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा ताबा घेऊन इमारत रिकामी केली असल्याचे कळते.

वरळीच्या ओल्ड पासपोर्ट आॅफीसजवळ सिलेंडर ब्लास्ट
SHARES

वरळीच्या ओल्ड पासपोर्ट आॅफीसमधील एका कार्यालयात एसीचा सिलेंडर ब्लाॅस्ट झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा ताबा घेऊन इमारत रिकामी केली असल्याचे कळते.

हेही वाचा:- मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश

वरळीच्या अॅनी बेझंट मार्गावरील मनीष कमर्शिएल सेंटर इमारतीत लावण्यात आलेल्या एसीच्या गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. या अपघातात सुचिता कौर (३०) ही तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. सुचिताच्या हाताल आणि डोक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामी केला आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे रस्त्यावर खिडक्यांच्या काचाही मोठ्या प्रमाणात पडल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचाः- ड्रग्स प्रकरणात पोलिसांना नाव सांग, उर्मिलाचं कंगनाला खुलं आव्हान

अग्निशमन दलाचे या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडीत करून बचाव कार्यास सुरूवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसीमधील नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा