बांगलादेशी म्हणून ताब्यात घेतलेल्या संशयिताचा मृत्यू

पोलिस ठाण्यात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे असून सोहेलला आणल्यापासून ते सोडतानाचे सर्व चित्रीकरण सीसीटिव्ही कॅमेऱ्यात झालेले आहे. सोहेलबाबतीत कोणतेही गैरवर्तन झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बांगलादेशी म्हणून ताब्यात घेतलेल्या संशयिताचा मृत्यू
SHARES

बांगलादेशहून मुंबईत विना परवाना वावरत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या २७ वर्षीय तरुणाची चौकशी करून सोडल्यानंतर अकस्मित मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चौकशी दरम्यान केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या घरातल्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचाः- मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश

चेंबूर येथील माहुल गाव परिसरातून बांगलादेशी नागरिक असल्याच्या संशयावरून मंगळवारी पोलिसांनी सोहेल ऊर्फ उस्मान शमसुद्दीन शेख(२७) व तय्यब मन्सुर शेख(४१) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी आरसीएफ पोलिस ठाण्यात आणले. चौकशीत दोघेही भारतीय असल्याचे पुढे आल्यानंतर दोघांना सोडून देण्यात आले.  सोहेलला ज्या वेळी सोडले, त्यावेळी त्याचे नातेवाईकही होते सोबत, तो मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाउंड परिसरातील राहत्या घरी आला असता. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखळ करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी सोहेलचा मृत्यू झाला.

हेही वाचाः- पोलीस भरतीत मराठा समाजाला १३ टक्के जागा? सरकारने दिलं ‘हे’ आश्वासन

सोहेलला उच्च दाबाचा त्रास होता, त्यात पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पोलिस ठाण्यात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे असून सोहेलला आणल्यापासून ते सोडतानाचे सर्व चित्रीकरण सीसीटिव्ही कॅमेऱ्यात झालेले आहे. सोहेलबाबतीत कोणतेही गैरवर्तन झालेले नाही. याबाबत अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस म्हणत आहेत. सोहेल खासगी टॅक्सी चालवून चरीतार्थ चालवत होता.त्याचे नुकतेच लग्न झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलेली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा