ईडीने चार वेळा पत्र लिहूनही पोलिस देईनात सुशांतचा मोबाइल

आधीपासूनच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असून पोलिसांचा तपास हा संशयास्पद आहे, असा आरोप सुशांच्या घरातल्यांकडून केला गेला. ईडीच्या तपासातही मुंबई पोलिस अडथळे आणत असल्याचा आरोप होत आहे

ईडीने चार वेळा पत्र लिहूनही पोलिस देईनात सुशांतचा मोबाइल
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतची मैत्रिण अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांतच भरत असल्याची ओऱड होत असताना. अंकिताने सोशल मिडियावर तिच्या घराचे पेपर आणि भरलेल्या हप्त्यांच्या माहिती शेअर केली. तर दुसरीकडे ईडीने मुंबई पोलिसांकडे सुशांतचा मोबाइल तपासासाठी मागितला आहे. मात्र ४ पत्र लिहून ही पोलिसांकडून कोणतेही उत्तर अथवा मोबाइल आला नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीचा अपघात

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ईडीने आणि फास आवळण्यास सुरूवात केली. ईडीने सुशांतसोबत ज्या कुणाचे व्यवहारी संबध होते. त्यांना चौकशीला बोलवले जात आहे. त्यात सुशांतच्या घरात राहणाऱ्या सिद्धार्थ पठाणीपासून ते त्याच्या नोकरापर्यंत सर्वांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती (रियाचा भाऊ), इंद्रजित चक्रवर्ती (रियाचे वडिल), माजी व्यवस्थापिरा श्रूती मोदी आणि दोघांच्या सीएची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ईडीने रिया च्या मोबाइलचे डिटेल्स , लॅपटाँप, आयपॅड हे जप्त केल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांवर होत असलेल्या आरोपानुसार सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी त्याचा फोन फाँरेन्सिक लॅबला पाठवणे आवश्यक होते. मात्र मुंबई पोलिसांनी तसं न करता तीन दिवस तो फोन स्वतःजवळ ठेवल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. त्यामुळे न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडून उशिर झाल्याने तो घेतला ही जात नव्हता, तसेच महत्वाचा पुरावा मानला जाणारा मोबाइल फोन देण्यास पोलिसांनी उशिर का केला. याचे खुलासा पत्र ही मागितल्याचा दावा एका वृत्त वाहिनीने केला होता.

हेही वाचाः- जुहूतील ‘ते’ प्रकरण पोलिसांच्या आलं अंगलट, चार पोलिस निलंबीत

दरम्यान ईडीने सुशांत आत्महत्येच्या तपासात त्याच्या खात्यातून मनी लाँड्रिग झाली आहे या अनुशंगाने तपास करत असताना. त्यांनी सुशांतचा मोबाइल तपासाच्या अनुशंगाने मुंबई पोलिसांकडे मागवला. मात्र ४ वेळा पत्र लिहूनही मुंबई पोलिसांनी कोणतेही उत्तर अद्याप ईडीला दिले नसल्याचे कळते. खरतर सुरवातीपासूनच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असून पोलिसांचा तपास हा संशयास्पद असल्याचा आरोप सुशांच्या घरातल्यांकडून केला जात आहे. अशात  चार वेळा पत्र लिहूनही सुशांतचा मोबाइल दिला जात नसल्यामुळे ईडीच्या तपासातही मुंबई पोलिस अडथळे आणत असल्याचे दिसते.

 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा