लाॅकडाऊनमध्ये मुंबईच्या समुद्रात डिझेल तस्करी, तिघांना अटक

पोलिसांनी आरोपींकडून ४३ हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या डिझेलची किंमत ३५ लाख रुपये आहे. भाऊचा धक्का परिसरात एक टग बोटमधून हे डिझेल जप्त करण्यात आले असून परदेशी जहाजातून ते आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

लाॅकडाऊनमध्ये मुंबईच्या समुद्रात डिझेल तस्करी, तिघांना अटक
SHARES

लाॅकडाऊनमुळे मुंबईत सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात कोरोनामुळे पोलिसांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले असताना. संधीचा फायदा घेत, तेल तस्करांनी पून्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. समुद्र मार्गे डिझेलची तस्करी करणा-या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबई पोलिस गस्त घालणार ‘स्पोर्ट्स बाईक’वरून

गुन्हे शाखेच्या गुप्तचर कक्षाचे (सीआययू) सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे भाऊचा धक्का येथे सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी बरसातू या टग बोटमध्ये छापा टाकण्यात आला. बेलार्ड पिअर येथील एका कंपनीच्या मालकीची ही बोट असून त्यात नऊ खलाशी उपस्थीत होते. २९ मेपासून ती तेथे उभी आहे. त्यावेळी तपासणीत ४३ हजार १०४ लिटर डिझेल पोलिसांना सापडले. त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. त्यावेळी मुख्य अभियंता देबाशीस विश्वास व मास्टर इस्माईल मुजावर यांना या डिझेलबाबत अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली. पण ती न दिल्यामुळे या दोघांसह बोटीचा अधिक्षक राजेश कुटे यांना अटक करण्यात आली.त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचाः- पहिली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

पोलिसांनी आरोपींकडून ४३ हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या डिझेलची किंमत ३५ लाख रुपये आहे. भाऊचा धक्का परिसरात एक टग बोटमधून हे डिझेल जप्त करण्यात आले असून परदेशी जहाजातून ते आणल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या तीन वर्षात या बोटीचा वापर माल ने आण करण्यासाठी करण्यात आलेला नाही. पण त्यानंतरही ती बोट समुद्रात का ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बोटीचा वापर डिझेल तस्करीसाठी करण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास करत आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा