दिग्दर्शक महेश भट्ट यांची पोलिसांनी केली २ तास चौकशी

पोलिसांनी कंगनाला ही समन्स बजावला असून गरज पडल्यास करण जोहरला हीचौकशीसाठी पोलिस बोलवतील असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पूर्वीच प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांची पोलिसांनी केली २ तास चौकशी
SHARES

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. सुशांत सिंग राजपूतने केलेल्या आत्महत्येला घराणेशाही कारणीभूत असल्याची चर्चा सर्वत्र  सुरू होती. त्यात अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मिडियावर महेश भट्ट यांना अनुसरूण ट्विट केली होती. त्यानुसार पोलिसांनी भट्ट यांची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी कंगनाला ही समन्स बजावला असून गरज पडल्यास करण जोहरला हीचौकशीसाठी पोलिस बोलवतील असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पूर्वीच प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विविध कलाकार, दिग्दर्शक आणि बाँलीवूडमधील कलाकारांना वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले जात आहे. या आत्महत्या प्रकरणांचे वृत्तांकन करण्यासाठी प्रसारमाध्यम आणि पत्रकार मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर जमत आहे. तर कलाकारांन पाहण्यासाठी नागरिक ही गर्दी करत असल्यामुळे भट्ट यांची चौकशी त्यांच्या घराजवळील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात करण्यात आली. तब्बल २ तासाच्या चौकशीनंतर भट्ट यांना पोलिसांनी जाण्यास परवानगी दिली.  मूळात या प्रकरणात कंगनाने सोशल मिडियावर भट्ट यांच्यावर ट्विटवरून आरोप केले होते. तसेच सुशांतच्या आत्महत्या दरम्यान, महेश भट्ट हे त्याच्या अधिक जवळ असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांना चौकशीला बोलवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत ४०हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचाः- सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्याला कुठले नैराश्य होते, त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत होती, आपले करिअर संपणार, मला कोणीतरी मारणार आहे असे त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती, करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असताना तो अचानक नैराश्यात का गेला होता. त्याच्या आत्महत्येमागे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आता बॉलिवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संजय लिला भन्साली, रुमी जाफरी, आदित्य चोप्रा यांच्यानंतर पोलिसांनी कंगणा राणवत हिला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. मात्र कंगणा ही सध्या मनाली येथे वास्तव्यास आहे, तिला मुंबईत येणे शक्य नाही.

हेही वाचाः- Ram Mandir: उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ ढोंगीपणा, विहिंपची टीका

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगणाने काही व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करताना महेश भट्ट, करण जोहरसह इतर काही निर्माता-दिग्दर्शक, कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर गटबाजीसह घराणेशाहीचा आरोपकरुन तिने एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे पोलिसांनी महेश भट्ट यांच्यासह करण जौहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. मात्र येथेही कंगणाने करण जौहरला चौकशीसाठी का बोलविले नाही, याबाबत ट्वीट केले आहे. दरम्यान, गरज पडल्यास करण जौहर याचीही पोलिसांकडून चौकशी होऊ शकते. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता पोलिसांनी ४० हून अधिक नागरीकांची पोलिसांनी जबानी नोंदविली आहे. त्यात सुशांतचा स्वयंपाकी निरज सिंग, घरगडी केशव बच्चानार, मॅनेजर दीपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ राममूर्ती पिठानी, बहीण नितू सिंग, मितू सिंग, वडील के. के सिंग, अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, व्यावसायिक मॅनेजर श्रृती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी, लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी, यशराज फिल्मचे अध्यक्ष आणि निर्माता आदित्य चोपडा, तीन पत्रकार, तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाचा समावेश आहे. आगामी काळात इतर काहींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा