अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची अभिनेत्रीला धमकी, सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. या दरम्यान त्याने अभिनेत्रीच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता.

अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची अभिनेत्रीला धमकी, सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
SHARES

भोजपूरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तिचे अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदनामी न करण्यासाठी तिच्याजवळ आरोपींनी तिच्याजवळ चक्क खंडणी मागितल्याचा आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- Mumbai Rains मागील २४ तासांत शून्य पावसाची नोंद

ओशिवरा परिसरात राहणारी २८ वर्षीय अभिनेत्री भोजपूरी चित्रपटांमध्ये काम करते. पीडित अभिनेत्री आरोपीला २०१६ पासून ओळखते.  अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अभिनेत्रीशी जवळीकता साधली. तसेच तिला लग्नाचे आणि चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. या दरम्यान त्याने अभिनेत्रीच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता.  तसेच पीडित अभिनेत्रीचा कोलकत्ताचा दिग्दर्शक मित्र मुंबईत आला असताना. त्याची मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो अभिनेत्रीकडे थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्या दोघांचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढले. तसेच आरोपी आणि त्याच्या मित्रांनी अभिनेत्रीच्या घरात घुसून तिच्या मित्रालाही मारहाण केली. कहर म्हणजे आरोपींना अभिनेत्रीला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्यृची धमकी दिली.

हेही वाचाः- तर तिथेच राजीनामा दिला असता- उदयनराजे भोसले

या प्रकरणी अभिनेत्रीने चार जणांविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलिसांनी चारही आरोपींविरोधात ३७६,३७७,३५४(क), ३८४,३६५,३२३,४५२,५०४,३४ भा.द.वि कलमांसह  माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस अधिक तपास करत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा