मुसळधार पावसात टकटक गँगने ‘या’ मराठी अभिनेत्याचा मोबाइल चोरला

लक्षविचलीत झाल्याचे पाहताच गाडीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या चोराने गाडीतून मोबाइल घेऊन पळ काढला. मुसळधार पावसात अवघ्या काही क्षणात हे चोर त्यांच्या डोळ्या आड झाले

मुसळधार पावसात टकटक गँगने ‘या’ मराठी अभिनेत्याचा मोबाइल चोरला
SHARES

मुंबईतल्या पश्चिम उपनगरात टकटक गँगची मोठी दहशत आहेत. भल्या भल्यांना या टोळीने लुटल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. अशाच या भूरट्या चोरांच्या फसवणूकीला ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपूरे ही बळी पडले आहेत. त्यांना आलेला हा अनुभव त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच अशा भूरट्या चोरांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केलेले आहे.

हेही वाचाः- काय सांगता! न्यायालयातून विजय मल्ल्याची कागदपत्र गायब

मुंबईत सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात कांदिवलीच्या समतानगर जवळील परिसरात दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यात गणेशपूरे हेही अडकले होते. ते गाडी चालवत असताना. कारच्या दुसऱ्याबाजूला एका व्यक्तीने कारच्या काचेवर टकटक केली.  अचानक त्याने गाडीचा दरवाजा उघडल्याने गणेशपूरे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी गणेशपुरेच्या शेजारी असलेल्या काचेवर आणखी एक जणाने जोरदार काच वाजवली. गणेशपूरे यांचे लक्षविचलीत झाल्याचे पाहताच गाडीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या चोराने गाडीतून गणेशपूरे यांचा मोबाइल घेऊन पळ काढला. मुसळधार पावसात अवघ्या काही क्षणात हे चोर त्यांच्या डोळ्या आड झाले. या प्रकरणी गणेशपूरे यांनी तक्रार नोंदवली नाही.

हेही वाचाः-  ठाकरेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी महिला अटकेत, जामीन देण्यासाठी भाजपनेत्याने केली मदत

मात्र घडलेल्या प्रकाराची माहिती गणेशपूरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून देत, “माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालतंय. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते,” त्यामुळे अशा टकटक गँगपासून सतर्क राहण्याचे आवाहन गणेशपुरे यांनी केलं आहे.


संबंधित विषय