ठाकरेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, अटक महिलेला भाजप नेत्याने केली मदत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी मागील अनेक दिवसांपासून एकमहिला आक्षेपार्ह टिका करत होती. ऐवढेच नवे तर उद्धव ठाकरेंचा फोटो ऐडीट करून तिने मौलवी झाल्याचे दाखवण्यात आले.

ठाकरेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, अटक महिलेला भाजप नेत्याने केली मदत
SHARES

महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याच्या नावाने सोशल मिडियावर आक्षेपार्ह ट्विट केल्याची घटना ताजी असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी सोशल मिडिया आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यां महिलेविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तिला अटक केली आहे. मात्र या महिलेला जामीन मिळवण्यासाठी मदत करा, असे भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट करत देवांग दवे यांना टँँग केले. त्यानुसार देवांग दवे यांनी महिलेला जामीन मिळवून देण्यास मदत केली. तसेे तसे ट्विटही देवांग देवांंग दवेने केलं आहे. या पूर्वीही महाविकास आघाडीच्या नेत्यांविषयी अशाच प्रकारे  आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवून घेतला होता.

 सोशल मिडिया म्हणजे माहितीचे मायाजाल, मात्र लाॅकडाऊनच्या काळात सोशल मिडियाचा वापर हा माहितीसाठी कमी आणि आक्षेपार्ह ट्विट आणि अफवा पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी ५०० हून अधिक गुन्हेही नोंदवलेले आहेत. असे असताना अशा बेजबाबदार व्यक्तींची संख्या काही कमी झालेली नाही. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी मागील अनेक दिवसांपासून एकमहिला आक्षेपार्ह टिका करत होती. ऐवढेच नवे तर उद्धव ठाकरेंचा फोटो ऐडीट करून तिने चुकीच्या पद्धतीने पोस्ट केला. या घटनेची गंभीर दखल युवा सेनेचे पदाधिकारी  आणि वकिल धर्मेंद्र मिश्रा यांनी घेत, सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. पोलासांनी तपासा दरम्यान हे कृत्य सुनैला होले या महिलेने केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी भा. दं. वी. कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करत संबंधित महिलेला अटक केली.

हेही वाचाः-'या' दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका

याआधीही मिश्रा यांनी अशाच प्रकारे एक गुन्हा व्हि.पी.रोड पोलिस ठाण्यात नोंदवलेला आहे.  १ जुलैला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बद्दल ट्वीट करताना आरोपीने शिवीगाळ गेली आहे. याशिवाय ३० जून व १ जुलैमध्येही संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही १ जूनला या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये त्यांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आले आहे. धर्मेंद्र मिश्रा यांनी हे सर्व ट्वीट पाहिल्यानंतर याबाबत व्हीपी रोड पोलिसांकडे याबाबत रितसर तत्कार केली. तक्रारीमध्ये संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या आक्षेपाह्र ट्वीटचे स्क्रीनशॉर्टही पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः-“ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”


संबंधित विषय