मोबाइल गेमच्या वेडापायी जीव जाता जाता वाचला...

  Parel
  मोबाइल गेमच्या वेडापायी जीव जाता जाता वाचला...
  मुंबई  -  

  मोबाइल गेमचे व्यसन किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय हळूहळू का होईना, पण सर्वांना येऊ लागला आहे. मुंबईभर सध्या ब्ल्यू व्हेल गेमची चर्चा रंगलेली आहे. त्यातच मोबाइल गेम खेळू न दिल्याने एका हट्टी मुलाने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. दादर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याला समुपदेशन करून पुन्हा पालकांच्या हवाली केले.

  विक्रोळीत राहणाऱ्या या १४ वर्षांच्या मुलाचे वडील रिक्षा चालक आहेत. मुलगा सतत मोबाइल गेम खेळण्यात व्यस्त राहात असल्याने त्यांनी मुलाला मोबाइल गेम खेळण्यापासून रोखले. वडिलांच्या या भूमिकेमुळे हा मुलगा इतका नाराज झाला की त्याने थेट आत्महत्या करण्याचाच निर्णय घेतला.

  त्यासाठी त्याने परळ रेल्वे स्थानक गाठले. आत्महत्या करण्यासाठी तो रेल्वे रुळांवरही उतरला. पण त्याच वेळेस समोरून येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने त्याला बघून ट्रेन जागीच थांबवली.

  आरपीएफने या मुलाला ताब्यात घेऊन दादर चौकीत आणले आणि त्याच्या वडिलांना बोलावून घेतले. आपला मुलगा आत्महत्या करण्यासाठी रुळांवर उतरल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी मुलाची समजून काढून त्याला पालकांच्या ताब्यात दिले.  हे देखील वाचा -

  डेंजरस कोण ? गेम की...?

  'ब्ल्यू व्हेल' गेम थांबवण्यासाठी केंद्राची मदत घेणार - मुख्यमंत्री  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.