कुख्यात गुंड युसुफ बचकानाच्या तीन हस्तकांना अटक, कर्नाटकमध्ये केली विकासकाची हत्या

विकासकाची हत्या करणारे आरोपी मुंबईचे असल्याचे कळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मदत घेऊन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या

कुख्यात गुंड युसुफ बचकानाच्या तीन हस्तकांना अटक, कर्नाटकमध्ये केली विकासकाची हत्या
SHARES

कर्नाटकच्या धारवाड येथे एका बांधकाम व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तींनी ६ आँगस्ट २०२० रोजी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्ये प्रकरणी कर्नाटकच्या ओल्ड हुबळी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. या हत्याकांडामागे कर्नाटकमधील कुख्यात गुंड युसुफ सुलेमान कादरी उर्फ युसुफ बचकाना याचा हात असल्याचे निदर्शनास आले. बचकानाच्या एका हस्तकास गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात हात असलेल्या अन्य तीन आरोपींना गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी कुर्ला नेहरूनगर येथून मंगळवारी अटक केली आहे. हे आरोपी मुंबईत वास्तव्यास असल्याचे कळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी मुंबई गाठत गुन्हे शाखेच्या पोलिसांची मदत घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या आरोपीस बेड्या ठोकत त्याचा ताबा कर्नाटक पोलिसांना दिला आहे. निलेश नांदगावकर, सुनिल उर्फ मामा देवराम बनसोडे, नवनाथ अर्जुन डोळस अशी या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचाः- बनावट पासपोर्टप्रकऱणी कुख्यात गुंड एजाज लकडावालावर नवा गुन्हा

एकेकाळी कुख्यात गुंड छोटा राजनसाठी काम करणारा कर्नाटकचा गुंड युसुफ बचकाना तुरुंगातूनही सूत्र हालवत असल्याचे पून्हा एकदा पुढे आले आहे. युसुफवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या युसुफला म्हैसूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र कारागृहात बसूनही युसुफ हा आपली टोळी चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून युसुफच्या सांगण्यावरून त्याच्या हैद्राबाद आणि मुंबईतल्या हस्तकांनी ६ आँगस्ट रोजी कर्नाटकचा बांधकाम व्यावसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल उर्फ अलियास उर्फ फ्रुट इरफान याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकऱणा ओल्ड हुबळी पोलिसांनी १४३,१४७,१४८,३०७,१४९,३०२ भा.द.वि कलमांसह ३, २५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. पोलिस तपासात या मागे युसुफचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचाः- कुख्यात गुंड छोटा शकीलच्या बहिणीचे निधन

पोलिसांनी युसुफच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवल्यानंतर त्याता मुंबईतील हस्तक हा वारंवा त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कर्नाटक पोलिस त्याच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांना त्या हस्तकाला पकडण्यासाठी मदत मागितल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवस, अतुल डहाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, अतुल आव्हाड, आशिष शेळके, पोलिस उपनिरीक्षक हेमंत गिते, हरेष पोळ आणि इतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला दहिसर येथे सापळा रचून राजेंद्र उर्फ राजू नेपालीला अटक केली. या हत्याकांडमध्ये युसुफने आरोपीला गुन्ह्यांची माहिती देत, शूटर पुरवण्यासाठी गुन्ह्यांपूर्वी २ लाख आणि गुन्हा घडल्यानंतर १० लाख दिल्याचे निष्पन्न झाले. हा आरोपी या पूर्वी मुंबईच्या बोरिवली, कस्तुरबा,वनराई, पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः-सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता

यातील आरोपी निलेश नांदगावकर हा एका डायमंड राॅबरी केसच्या गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात बंद असताना त्याची ओळख युसुऱ बचकाना आणि राजू नेपाळीशी ओळख झाली. मार्च २०२० मध्ये घाटकोपरमध्ये एका बांधकाम साईट संभाळण्याचे काम मिळण्यास नांदगावकरला अडचणी येत होत्या, तेव्हा युसुफने त्याला अडचणी दूर करून देतो असे सांगून धारवड येथील विकासकाची सुपारी दिली. त्या साठी त्याला दहा लाख रुपयेही दिले. त्यानुसार युसुफच्या सांगण्यावरून नांदगावकरने सुनिल उर्फ मामा देवराम बनसोडे, नवनाथ अर्जुन डोळस यांच्या मदतीने विकासकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या आरोपींना कर्नाटक पोलिस मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांच्या गावी पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी तिन्ही आरोपींना कुर्ला नेहरूनगरच्या एसटी स्टॅड येथून अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा