६२६ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी दोघांना अटक


६२६ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी दोघांना अटक
SHARES

बोगस कंपन्या स्थापून ६२६ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवणाऱ्या दोन व्यावसायिकांना जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. राजेश मेहता, अक्षय जानी अशी या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात अन्य ९ जणांचा सहभागही निश्चित झाला असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. 


२६ बोगस कंपन्या

 राजेश मेहता ग्रुप, वन वर्ल्ड ग्रुप व आणखी एका कंपनीने संगनमत करून २६ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्यानुसार राजेश मेहता ग्रुपने ९, वन वर्ल्डने ११ व तिसऱ्या ग्रुपने ६ कंपन्यांच्या मार्फत एकमेकांशी व्यवहार झाल्याचे दाखवले. प्रत्यक्षात हे व्यवहार झालेच नसल्याचे जीएसटी विभागाच्या पाहणीत आढळले. केवळ इन्व्हॉईसच्या माध्यमातून हे व्यवहार झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार मेहता व जानी यांना अटक करण्यात आली. 


एकमेकांना इन्वाईस

मेहता ग्रुपने या संपूर्ण प्रकरणात २३७ कोटी ९३ लाखांचा जीएसटी बुडवून सरकारचा तोटा केल्याचा आरोप आहे. जानीने ७४ कोटी २२ लाख रुपयांचा जीएसटी बुडवला आहे. सर्व कंपन्यांनी एकूण बुडवलेला जीएसटीचा अाकडा ६२६ कोटी रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व कंपन्यांनी एकमेकांना इन्वाईस दिले. तसंच एकमेकांकडून वस्तू खरेदी केल्याचेही दाखवले. अशा पद्धतीने तीनही ग्रुपने एकमेकांमध्ये व्यवहार दाखवून जीएसटी बुडवला. याप्रकरणी नऊ व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.हेही वाचा - 

अारोपींना सोडवण्यासाठी बोगस जामीनदार बनलेली टोळी गजाआड

एक लाखांच्या बनावट नोटांसह एकाला अटक
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा