सलमानविरोधातलं 'हे' वाॅरंटसुद्ध रद्द!

सन २००२ मध्ये मुंबईत घडलेल्या हिट अॅण्ट रन प्रकरणात हे वाॅरंट काढण्यात आलं होतं. सलमानने मद्यधुंद अवस्थेत लँडक्रूजर गाडी चालवत फुटपाथवर झोपलेल्या जणांना चिरडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर चौघे जखमी झाले होते.

सलमानविरोधातलं 'हे' वाॅरंटसुद्ध रद्द!
SHARES

हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधातील जामीनपात्र वाॅरंट रद्द करत मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी त्याला दिलासा दिला. गेल्या महिन्यात सलमान खानविरोधात हे जामीनपात्र वाॅरंट काढण्यात आलं होतं. काळवीट शिकार प्रकरणात काही दिवसांपूर्वीच सलमान जामिनावर बाहेर आला आहे.

कुठल्या प्रकरणातलं वाॅरंट?

सन २००२ मध्ये मुंबईत घडलेल्या हिट अॅण्ट रन प्रकरणात हे वाॅरंट काढण्यात आलं होतं. सलमानने मद्यधुंद अवस्थेत लँडक्रूजर गाडी चालवत फुटपाथवर झोपलेल्या जणांना चिरडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर चौघे जखमी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली असली, तरी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला दाखल करून घेतल्याने त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच काळवीट शिकार प्रकरणात जयपूर न्यायालयाने सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी सत्र न्यायालयात अपील करत जामीन मिळवला.

हेही वाचा-

काळवीट प्रकरणातला सलमानचा बेपत्ता 'देवदूत' कोण?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा