प्रसिद्ध कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सच्या संचालकाचा अपघाती मृत्यू

मेवाणी यांना दातासंदर्भातील समस्या उद्भवली होती. याच कारणामुळे आपल्या मित्राकडे येत एखादा उत्तम डॉक्टर सुचवावा असे विचारण्यास आले होते. पण ज्या वेळी मेवाणी इमारतीत आले त्यावेळीच ही दुर्घटना घडून त्यांचा मृत्यू झाला.

प्रसिद्ध कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सच्या संचालकाचा अपघाती मृत्यू
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक  विशाल मेवाणी याचा लिफ्ट मध्ये अडकून अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी वरळीत घडली. या प्रकऱणी वरळी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल आपल्या मित्राला भेटण्यासाठी वरळीतील दुमजली इमारत 'ब्यूना विस्ता' येथे गेले असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचाः- कंगना मुंबईत आली की तिला... महापौरांनी दिले संकेत

वरळी येथे विशाल हे आपल्यामुलीसह मित्राच्या घरी निघाले  होते. लिफ्टचे बटन दाबल्यानंतर अचानक दरवाजा उघडला. त्यावेळी विशाल यांनी लिफ्ट आली असल्याचा भास झाल्याने ते पुढे चालत गेले. मात्र ते लिफ्टच्या शॉफ्ट मध्ये पडले. लिफ्ट येण्यापूर्वी त्यांनी शॉफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र वरच्या मजल्यांहून वेगात आलेल्या लिफ्टखाली ते दबले गेले. या अपघातावेळी त्यांची मुलगीही सोबत होती. मात्र सुदैवाने तिने वाचली. या दुर्घटनेची माहिती कळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहचल्यावर मेवाणी यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ब्रीच कॅन्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणाचा अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याची माहिती वरळी पोलीसांनी दिली.

 हेही वाचाः- Vodafone-Idea ला मिळालं नवं नाव, पण ग्राहकांना भुर्दंड

तर ४६ वर्षीय मेवाणी यांच्या मित्राने पोलिसांना असे सांगितले की, ते आपली मुलगी रेशमा हिच्यासोबत वरळीतील त्यांच्या घरी आले होते. मेवाणी यांना दातासंदर्भातील समस्या उद्भवली होती. याच कारणामुळे आपल्या मित्राकडे येत एखादा उत्तम डॉक्टर सुचवावा असे विचारण्यास आले होते. पण ज्या वेळी मेवाणी इमारतीत आले त्यावेळीच ही दुर्घटना घडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र मेवाणी यांची मुलगी सुदैवाने बचावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा