पाठलाग करणाऱ्याला महिलेने घडवली अद्दल

Andheri west
पाठलाग करणाऱ्याला महिलेने घडवली अद्दल
पाठलाग करणाऱ्याला महिलेने घडवली अद्दल
पाठलाग करणाऱ्याला महिलेने घडवली अद्दल
पाठलाग करणाऱ्याला महिलेने घडवली अद्दल
See all
मुंबई  -  

हरियाणातील भाजप नेत्याच्या मुलाने एका मुलीचा पाठलाग केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच अगदी तसाच काहीसा प्रकार मुंबईतही घडला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी महिलेचा पाठलाग करणाऱ्या या विकृताला चांगलाच धडा शिकवला आहे.


काय आहे प्रकरण?

एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या नितीश शर्मा (34) याला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अदिती नागपॉल नावाची महिला रविवारी रात्री आपल्या दोन मुलांसह घरी जात होती. त्यावेळी आपला कुणीतरी पाठलाग करत असल्याचे त्या महिलेला जाणवले. पण सुरुवातीला आदितीने दुर्लक्ष केले आणि ती घरी निघून गेली. मात्र मध्यरात्री 2 ते 2.30 वाजताच्या दरम्यान तिच्या घराची अचानक बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर तिचा पाठलाग करत असलेला व्यक्ती तिच्या दारात उभा होता. ते बघून तिला धक्काच बसला. सुरुवातीला त्याने त्या महिलेकडून पाणी मागितले. आता मात्र अदितीला गप्प बसून चालणार नव्हते. तिने आवाज देऊन सुरक्षा रक्षकाला बोलावले. त्यानंतर लगेच नितीशने तिथून काढता पाय घेतला आणि तो गेटच्या बाहेर जाऊन उभा राहिला.


रात्री अडीच वाजता कोण्या अनोळखी माणसाने घरात येऊन बेल वाजवणे म्हणजे जरा अतीच झाले, मी वॉचमनला घेऊन खाली उतरले. तो गेटच्या बाहेरच उभा होता. त्यानंतर मी वॉचमनला सोबत घेतले आणि त्याला जाब विचारला असता आपल्याला तहान लागली असून पाणी हवे असल्याचे तो म्हणाला. तेवढ्यात मी लगेच त्याचे फोटो काढायला सुरुवात केली असता त्याने तिथून पळ काढला.

अादिती नागपॉल, पीडित महिला

एवढे सगळे झाल्यानंतर आदितीला गप्प बसता येणार नव्हते. तिने याची तक्रार थेट पोलिसांत केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार फेसबुकवर शेअर केला.

जशी ही पोस्ट व्हायरल होऊ लागली, तसा पोलिसांवरील दबाव देखील वाढू लागला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या काही तासांतच मालाडवरून नितीश शर्माला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्याची गाडी देखील जप्त केली आहे.हेही वाचा -  

दिल्लीतील एअर होस्टेसच्या मारेकऱ्यांना वांद्र्यात अटक

या विकृतांना ठेचायलाच हवं!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.