मुंबई फिरायला आलेल्या मुलीसोबत छेडछाड


मुंबई फिरायला आलेल्या मुलीसोबत छेडछाड
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल रेल्वेतील छेडछेडीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. अशीच एक घटना गुरूवारी घडली. सांगलीहून मुंबईत फिरायला आलेल्या एका १४ वर्षीय मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली. या प्रकरणी ३३ वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचं नाव अरविंद पुंड असं आहे.


नेमकं काय घडलं?

मुंबई दर्शनासाठी सांगलीतील एक जोडपं आपल्या १४ वर्षीय मुलीसह पुणे-मुंबई डेक्कन क्वीनच्या जनरल बोगीतून प्रवासाला निघाले. गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास एक्स्प्रेस माटुंगा ते दादर स्थानकांदरम्यान असताना आरोपीने मुलीची छेड काढली.


शौचालयात लपला

पीडित मुलीने आरडाओरड करताच पळ काढून तो एक्स्प्रेसमधील शौचालयात लपला. त्यानंतर सीएसएमटी स्थानकात एक्स्प्रेस येताच कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शौचालयात लपलेल्या अरविंदला शोधून त्याला ताब्यात घेतलं.

या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पण, या मुलीच्या छेडछाडीची घटना माटुंगा ते दादर स्थानकांदरम्यान घडल्याने गुन्ह्याचा पुढील तपास दादर रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.



हेही वाचा-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या वाँटेड हस्तकाला ठाण्यातून अटक

मम्मीच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा गुन्हा दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा