चालत्या ट्रेनसमोर झोपली महिला!


SHARES

23 जून...घाटकोपर रेल्वे स्टेशन...सकाळची गर्दीची वेळ...सीएसटीएमहून कल्याणला जाणारी लोकल फलाट क्रमांक एक वर आली. ट्रेन स्टेशनमध्ये येताच फलाटावर उभ्या असलेल्या लोकांनी गर्दीतून मार्ग काढत ट्रेनमध्ये चढण्याची तयारी सुरु केली. एक महिला मात्र भलतीच तयारी करत होती. फलाटाच्या अगदी काठावर ही महिला उभी होती. कारण तिला मुळात ट्रेन पकडायचीच नव्हती. तर तिला ट्रेनच्या समोर उडी मारुन आत्महत्या करायची होती. तशी तिने मारलीही. तिच्यावरुन ट्रेन पुढे आली. पण अनपेक्षितपणे ती महिला वाचली.



या महिलेने कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनच्या पुढ्यात उडी मारली. पण सुदैवाने ही महिला ट्रॅकच्या मधोमध पडली. तिच्यावरुन ट्रेन पुढे आली. मात्र ट्रेन आणि ट्रॅकच्या दरम्यान असलेल्या पोकळ जागेमध्ये आल्यामुळे या महिलेला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पण खरी धक्कादायक बाब मात्र पुढेच आहे.



ही घटना घडली 23 जून रोजी सकाळी. मात्र आरपीएफने चक्क घटनेच्या 10 दिवसांनमंतर हा व्हिडिओ पाहिला. कारण हा धक्कादायक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आरपीएफने त्याचा तपास सुरु केला आहे. याचाच अर्थ असा, की जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये कोणताही कर्मचारी तिथे लक्ष ठेवण्यासाठी हजर नव्हता.



ही महिला सदर घटनेनंतर तात्काळ उठून फलाट क्रमांक 2 वर गेली आणि तिथून निघून गेली. त्यामुळे ही महिला कोण होती? तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याची कोणतीही माहिती आरपीएफकडे उपलब्ध नाही. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही असूनही त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसेल, तर त्या सीसीटीव्हींचा उपयोग तरी काय? असाच प्रश्न उपस्थित होतो.



हेही वाचा

जळगावच्या शेतकऱ्याची वसईत आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

संतप्त प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये फेकली मिरचीपूड, सीसीटीव्हीत घटना कैद



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा