समीर भुजबळांना जामिनासाठी प्रतिक्षाच

समीर भुजबळ यांच्या जामिनावर एक-दोन नव्हे, तर तीनदा सुनावणी झाली. पण प्रत्येकवेळेस त्यांच्या जामिनीवरील सुनावणी पुढे ढकली जाते वा तहकूब होत अल्याने समीर भुजबळ यांचा कोठडीतील मुक्काम वाढतच चालला आहे.

समीर भुजबळांना जामिनासाठी प्रतिक्षाच
SHARES

मनी लाॅन्डरिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची जामिनासाठीची प्रतिक्षा संपता संपत नसल्याचं चित्र आहे. समीर भुजबळ यांच्या जामिनावर एक-दोन नव्हे, तर तीनदा सुनावणी झाली. पण प्रत्येकवेळेस त्यांच्या जामिनीवरील सुनावणी पुढे ढकली जाते वा तहकूब होत अल्याने समीर भुजबळ यांचा कोठडीतील मुक्काम वाढतच चालला आहे.


सुनावणी पुन्हा तहकूब

गुरूवारी उच्च न्यायालयात समीर भुजबळांच्या जामिनावर सुनावणी झाली. ही सुनावणी तिसरी सुनावणी होती. यावेळी तरी समीर भुजबळांना जामीन मिळेल असं वाटत असताना उच्च न्यायालयानं जामीन अर्जावरील सुनावणी ५ जूनपर्यंत तहकूब केली.


कारण काय?

ईडीकडून युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्यानं तसंच काही प्रश्नांची उत्तरं अतिरिक्त साॅलिसीटर जनरलला देता न आल्यानं ही सुनावणी पुढं ढकलण्यात आली.

मनी लाॅन्डरिंग प्रकरणातील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना ४ मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर याच न्यायानं आपल्यालाही जामीन मिळावा, असं म्हणत समीर भुजबळांनी जामिनासाठी उच्च न्यायालयाकडं अर्ज केला आहे.



हेही वाचा-

भुजबळ झाले सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह'

पडत्या काळात शिवसेनेची साथ - भुजबळ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा