महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

महागड्या गाड्यांची चोरी करून त्यांना परराज्यात विकणाऱ्या एका सराईत टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरांनी पळवलेली होंडा सीआरव्ही गाडी खार पोलिसांनी इंदोरहून जप्त केली आहे. पोलिसांनी यामधील आरोपी शमशाद उर्फ सद्दाम चिनाक शेख (२२), शिबू बिका (२२), केशर साहूद (१९) आणि अग्नेश राजगोर (१९) या चौघांना अटक केली आहे.


कसा घडला गुन्हा?

३० सप्टेंबरच्या रात्री धीरज सावला नावाचा व्यापारी आपल्या खार येथील मित्राच्या घरी जेवायला आला होता. त्यावेळी चालक हा गाडीसोबत खालीच थांबला होता. पण रात्री १२ च्या सुमारास हे चौघे आरोपी तिथे आले. सुरुवातीला त्यांनी चालकाशी बोलण्याचा बनाव केला आणि त्यानंतर संधी मिळताच एक जॅकेट टाकून त्यांनी चालकाला पकडून ठेवत त्याच्या खिशातील चावी काढून गाडी घेऊन पसार झाले.


कुठे सापडले चोर?

चोरीचा प्रकार समोर येताच पोलिसांनी हायवेवरील सगळ्या चौक्यांना सतर्क केले. पण तोवर हे आरोपी गाडीसह पसार झाले होते. या चौघांनी गाडी थेट मध्य प्रदेशपर्यंत नेली. पण इंदोर जवळ मात्र पोलिसांनी त्यांना गाठले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत आपण पकडले जाऊ या भीतीने या चोरांनी गाडी सोडून पळ काढला. मुंबईचा नंबर बघून इंदोर पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि गाडी खार पोलिसांना सोपवली.


मोबाईल विसरले गाडीतच!

पोलिसांपासून पळण्याच्या घाईत आरोपी आपला मोबाईल गाडीतच विसरले होते. त्यामुळे एक-एक करून पोलिसांनी चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ज्या शिताफीने या चौघांनी मिळून गाडीची चोरी केली होती, त्यावरून हे सगळे सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे.



हेही वाचा - 

मिर्ची पूड टाकून अज्ञातांनी लुटली कार

कार चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा