महापालिकेचे आवाहन ! गणपती विसर्जनासाठी चौपाट्यांवर करा आॅनलाईन बुकिंग

विसर्जनासाठी ऑनलाईन अॅप तयार करण्याचा विचारही महापालिकेकडून सुरु असून अद्याप डी विभागाकडून याबाबतचे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

महापालिकेचे आवाहन ! गणपती विसर्जनासाठी चौपाट्यांवर करा आॅनलाईन बुकिंग
SHARES

यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या संकटामुळे साधेपणात साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. समूह संपर्क टाळण्यासाठी पालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात मंडळ आणि घरगुती गणपतीसाठी नियमावली जारी केली आहे. त्यात गणपती विसर्जना वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीच्या गेटवरुनच महापालिकेनं नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडे गणेश मूर्ती पाठवा. अशी नियमावली जारी केली आहे. समूह संपर्क टाळण्यासाठी पालिकेच्या डी विभागाकडून ही नवीन शक्कल लढवण्यात आली आहे. तसेच विसर्जनासाठी ऑनलाईन अॅप तयार करण्याचा विचारही महापालिकेकडून सुरु असून अद्याप डी विभागाकडून याबाबतचे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

हेही वाचाः- ठाण्यातील 'हा' मॉल प्रवेशासाठी आकारणार शुल्क


गिरगांव चौपाटीवर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. मात्र, डी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नानाचौक, ताडदेव, मलबार हिल येथील गणेशमूर्तींची संख्या जास्त असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटीवर गर्दी टाळण्याचे आवाहन पालिकेसमोर असणार आहे. त्यावर उपाय म्हणून लहान  गणेशमूर्तींना विसर्जनाला नेण्यासाठी महापालिकेनं कर्मचारी नेमलेले आहेत. हे स्वयंसेवक  किंवा कर्मचारी सोसायट्यांच्या गेटपर्यंत येतील आणि तिथुनच मूर्ती चौपाटीवर घेऊन जातील. ज्यामुळे, रहिवाशांना गणेश विसर्जनासाठी सोसायटीबाहेरही पडण्याची गरज भासणार नाही. अशी कार्यप्रणाली गणपती विसर्जनासाठी काही दिवसांत महापालिकेकडून तयार केली जाणार आहे.

हेही वाचाः- ‘तो’ अनधिकृत भोंगा काढा, महापालिकेची जाहिर नोटीस


पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि घरगुती गणपतींसाठी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मूर्तीची उंची कमी करण्यात आली असून घरगुती गणपतीचेही घरच्या घरी किंवा पुढच्या वर्षी विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी मुंबईत ११ दिवसांत तब्बल दोन ते अडीच लाख मूर्तीचे विसर्जन होते. यावर्षी हे प्रमाण कमी होण्याची शक्यता असली, तरी काही प्रमाणात तरी मूर्ती विसर्जनासाठी येतील. हे गृहीत धरून पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे असून साधारण ३२ कृत्रिम तलाव पालिकेतर्फे तयार केले जातात. यावर्षी नैसर्गिक विसर्जन स्थळावरील समुद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. दरम्यान, जर नियोजनाप्रमाणे गणेश विसर्जनासाठी वेळ बुक करणारे अॅप तयार झाले तर, भाविकांना वेळ ठरवून येता येईल. कृत्रिम तलावावर फक्त मूर्ती देऊन त्यांनी निघून जायचे आहे. एका वेळेला साधारण दहा ते पंधरा लोकांना वेळ दिला जाईल, अशी माहिती डी विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय