परदेशातील नागरिकांना भारतातून ‘असा’ घालत होते गंडा, पोलिसांनी केला पर्दाफाश

कॅनडा, अमेरिका सारख्या देशातील नागरिकांना बोगस काँलसेंटरच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीला अटक सीआययूच्या पथकानं केली आहे

परदेशातील नागरिकांना भारतातून ‘असा’ घालत होते गंडा, पोलिसांनी केला पर्दाफाश
SHARES

कॅनडा, अमेरिका सारख्या देशातील नागरिकांना बोगस काॅलसेंटरच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीला अटक सीआययूच्या पथकानं केली आहे. निशांत नागराज शिरसिकर असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात या पूर्वीही फसवणूकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  

हेही वाचाः- मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच

मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेला निशांत हा मालाड परिसरात भाड़ेतत्त्वावर रहात होता.कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना त्याने स्वत:च बोगस आंतराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केला.  याच कॉल सेंटरच्या माध्यमातून त्याने गेल्या पाच वर्षात आमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची कोटयवधी डॉलर्सना फसवणूक केली आहे. सीआययुचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ ऑगस्ट रोजी निशांतला मालाड येथून ताब्यात घेतले. बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत निशांतला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४० लाख रूपयांच्या रोख रक्कमेसह १० लाखांची सोन्याची बिस्कीटे, अंमली पदार्थ आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

   हेही वाचाः- महाराष्ट्र पोलिस दलात १६ हजार १५ पोलिसांना कोरोना, एका दिवसात ५ जणांचा मृत्यू

गेल्या पाच वर्षापासून तो घरातूनच बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत होता. त्याने साथीदारांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमधून मोबाईल फ़ोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोटयवधी डॉलर्सना गंडा घातला आहे. महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाक़ी रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाईची भिती घालून पैसे उकळत होते

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा