परमबीर सिंह यांना दिलासा, अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा आहे.

परमबीर सिंह यांना दिलासा, अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश
SHARES

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे.

परमबीर सिंह हे भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलानं सुप्रीम कोर्टात दिली. परमबीर सिंह हे ४८ तासांमध्ये हजर राहू शकतात अशीही माहिती त्यांच्या वकिलानं दिली.

परमबीर सिंह हे भारतातच आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना जीवाचा धोका असल्यानं ते समोर येत नाहीत असं त्यांच्या वकिलानं सुप्रीम कोर्टात म्हटलं. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे निर्देश देत तपास, चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

परमबीर सिंह यांनी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यांनाच तक्रारदार केले जात असल्याचं त्यांच्या वकिलानं म्हटलं. परमबीर सिंह हे ४८ तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलानं दिली.

सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरगांव इथल्या खंडणी प्रकरणाचा तपास करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागानं परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर न राहील्यानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं.हेही वाचा

अल्पवयीन मुलीवर ४०० जणांकडून ६ महिने बलात्कार, पोलिसाचाही समावेश

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा