गोरेगाव पत्राचाळ प्रकरण: गैरव्यवहार प्रकरणी विकासकाला अटक

१०३४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान यांचा तुरुंगातून ताबा घेतला आहे.

गोरेगाव पत्राचाळ प्रकरण: गैरव्यवहार प्रकरणी विकासकाला अटक
SHARES

गोरेगाव सिद्धार्थ नगरमधील पत्राचाळ पुनर्विकासात गैरव्यवहार केल्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. चे(एचडीआयएल) सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. १०३४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान यांचा तुरुंगातून ताबा घेतला आहे. गोरेगावच्या पत्राचाळीतील बेघर झालेल्या रहिवाश्यांनी ४ सप्टेंबर रोजी म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढला होता. १२ वर्षांपासून पत्राचाळीचा प्रकल्प सुरु आहे, मात्र गेल्या ६ वर्षांपासून काम रखडलं आहे. तर चार वर्षांपासून चाळीतील रहिवाश्यांना भाडं ही देण्यात आलेलं नाहीये, यासाठी हा पत्राचाळ संघर्ष समितीमार्फत मोर्चा काढण्यात आला होता. १५ दिवसांच्या आत याबाबत निर्णय द्यावा अशी या रहिवाश्यांची मागणी केली होती. अन्यथा आत्मदहनाचा इशारा रहिवाशांनी दिला  होता.

हेही वाचा:-परिस्थिती चिंताजनक ! कोरोनामुळे आतापर्यंत २०२ पोलिसांचा मृत्यू

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधीत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. पंबाज अॅड महाराष्ट्र कॉ. बॅकेतील ६३३७ कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे वाधवान सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. त्यामुळे पत्राचाळप्रकरणी चौकशीसाठी वाधवान याला अटक करण्यात आले असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि.च्या संचालक पैकी एक वाधवान होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला; परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६६८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडत विकसकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत.

हेही वाचा:-गुड न्यूज! वकिलांनाही आता लोकलप्रवासाची मुभा

२०११ मध्ये या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२०(ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका संचालकाला यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून गैरव्यवहाराचा आकडा २ हजार कोटींपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा