मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठीच कोरोनाचा कट, सरकारविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्याला अटक

मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी कोरोना व्हायरस हा सरकारने आखलेला कट आहे, अशी फेसबुकवर पोस्ट टाकून अफवा पसरवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठीच कोरोनाचा कट, सरकारविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्याला अटक
SHARES

 मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी कोरोना व्हायरस हा सरकारने आखलेला कट आहे, अशी फेसबुकवर पोस्ट टाकून अफवा पसरवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शमीम इफ्तेखार खान (36) असं आरोपीचं नाव असून तो कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगरमध्ये राहतो. 

कोरोना व्हायरस अस्तित्वात नसून सरकारने एका ठराविक समाजाला टार्गेट करण्यासाठी हा कट आखला आहे, असा दावा शमीमने फेसबुक पोस्टमध्ये केला होता. तसंच कोरोनाशी संबंधित सर्व्हेदरम्यान प्रशासनाला कोणतीही माहिती देऊ नका असंही आवाहन त्याने या पोस्टमध्ये केलं होतं. पोलिसांनी या पोस्टची तात्काळ दखल घेत शमीम इफ्तेखार खान याला कलम १८८ आणि कलम ५०५ अंतर्गत अटक केली आहे.

मागील महिन्यात राजस्थानमध्ये कलम १४४ संबंधित अफवा सोशल मीडियावर पसरवत असल्या प्रकरणी २९ लोकांना अटक करण्यात आली होती. चुकीची माहिती प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अफवा रोखणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी सीएए आणि एनआरसीविरोधातील आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने करोनाचा कट आखला असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा किमान एक मीटर अंतर ठेवण्याचा सल्ला मानण्यास नकार दिला होता. आपण करोना रुग्णांची गळाभेट घेण्यास तयार आहोत असं ते म्हणाले होते.



हेही वाचा

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा

'साराभाई Vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

Coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा