शॅम्पूच्या बाटलीत लपवला 34 लाखांचा हिरा!

Mumbai Airport
शॅम्पूच्या बाटलीत लपवला 34 लाखांचा हिरा!
शॅम्पूच्या बाटलीत लपवला 34 लाखांचा हिरा!
शॅम्पूच्या बाटलीत लपवला 34 लाखांचा हिरा!
See all
मुंबई  -  

साडेपाच कॅरेट वजनाच्या आणि 34 लाख रुपये किंमतीच्या एका हिऱ्याची चोरी करणाऱ्या दोन चीनी नागरिकांना वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विशेष म्हणजे हे दोन्ही भामटे हिऱ्याची चोरी करून चीनला त्यांच्या मायदेशी जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी तपास यंत्रणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हे दोन्ही चोरटे पकडले गेले. तपास करणाऱ्या वनराई पोलिसांनी या प्रकरणी चियांग चांग क्विंग आणि डेंग झीयाबो यांना अटक केली आहे.


एक्झिबिशन सेंटरमधील हिऱ्याची चोरी

गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 27 जुलै ते 31 जुलै दरम्यान सोन्याचे आणि हिऱ्यांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले होते. शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी या प्रदर्शनात रतीलाल अँड सन्स कंपनीच्या स्टॉलवरील डिस्प्लेमध्ये 34 लाखांचा हिरा ठेवण्यात आला होता. पण काही वेळानंतर तो हिरा तिथून गायब झाला आणि त्या ठिकाणी नकली हिरा ठेवण्यात आला होता. जे तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मालकाला याबद्दल कळवले. मालकाने पाहणी केली, तेव्हा हा हिरा बनावटच असल्याचे समजले. चोरीला गेलेला हिरा 5.43 कॅरेटचा होता. ज्याची किंमत 34 लाख रुपये होती.

त्यावेळी मालकाने याची माहिती एक्झिबिशनच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)ला दिली. त्यानंतर मात्र याची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे आली.

यानंतर नेस्कोमधील सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आले. ज्यात दोन चिनी नागरिक बराच वेळ या स्टॉलजवळ संशयास्पदरित्या उभे होते. त्यानंतर वनराई पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरु केली. तपासणी केली असता चियांग चांग क्विंग आणि डेंग झीयाबो हे दोघेही छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या फ्लाईटच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मात्र क्षाणाचाही विलंब न करता पोलिसांनी इमिग्रेशनची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच एसबी 2 शाखेची एफआरआरओ तसेच सीआयएसएफची मदत घेतली आणि त्यांना फ्लाईट पकडण्यापासून थांबवले.


कसा केला हिरा जप्त

एवढ्यावरच हा प्रकार संपला नाही तर, आता दोघांकडून हिरा जप्त करणे बाकी होते. सगळी सूत्र आपल्या हाती घेतलेल्या झोन बाराच्या डीसीपी विनयकुमार राठोड यांनी चियांग चांग क्विंग आणि डेंग झीयाबो या दोघांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली. इथे देखील हे दोघे चीनी नागरिक असल्याने चौकशीत अडथळा येत होता. शेवटी पोलिसांनी दुभाष्याची मदत घेत जवळपास 7 तास चौकशी केली. त्यानंतर या दोघांनी हिरा चोरल्याचे मान्य केले. या दोघांनी 5.43 केरेटचा हा हिरा चोरून तो 5 एमएलच्या शॅम्पूच्या बाटलीत लपवला होता. हिऱ्यासोबतच पोलिसांनी या दोघांकडून दोन बनावट हिरे आणि एक मॅग्निफाईंग ग्लास (भिंग) जप्त केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त राजेश प्रधान यांनी दिली. पाच तासांपेक्षा देखील कमी वेळात मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.हेही वाचा -

20 लाखाच्या घड्याळाची चोरी

त्याने स्लिपरमध्ये लपवलं 14 लाखांचं सोनं!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.