मुका असल्याचे सांगायचा, अन् लाखोंचा माल चोरायचा!


मुका असल्याचे सांगायचा, अन् लाखोंचा माल चोरायचा!
SHARES

मुका असल्याचे सांगून मदत मागण्याच्या बहाण्याने घरात घुसायचे आणि संधी साधून मोबाइल, लॅपटॉप चोरुन पळ काढायचा, अशा युक्तीने लाखो रुपयांचे सामान चोरणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला काशीमीरा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले आहे. तसेच या मुलाच्या घरातून पोलिसांनी 3 लाख 14 हजार 500 रुपये किंमतीचे 22 स्मार्टफोन 4 लॅपटॉप आणि मुका असल्याचे आंध्र प्रदेश सरकारचे एक प्रमाणपत्रही जप्त केले आहे.

ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले की, श्रीकांत मंजन नावाचा हा मुलगा आंध्र प्रदेशातल्या वेल्लोर जिल्ह्यातील आरपी पालायम गावात राहणारा आहे. तो दहा दिवसांपूर्वीच विरार येथे आपल्या आजी-आजोबा आणि मामासोबत राहण्यासाठी आला होता. हा मुलगा आपली जीभ अशा रितीने दुमडायचा की समोरच्या व्यक्तीला त्याची जीभ तुटलेली वाटायची.


हेही वाचा

गावी जाताय? तुमच्या घरात चोरी होऊ शकते!

महिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी

मंत्रालयासमोर चोरी, सीसीटीव्हीत चोर कैद


काशीमीरा येथील श्रीकृष्ण सोसायटीत राहणारे अजित महाजन 20 मे रोजी सकाळी अंघोळ करत असताना त्यांच्या घराचा दरवाजा चुकून उघडाच राहिला होता. हीच संधी साधून या मुलाने त्यांच्या घरात प्रवेश करत 2 मोबाइल आणि पाकिट लंपास केले. महाजन यांच्या सोसायटीत लावलेल्या सीसीटीव्हीत हा मुलगा संशयास्पद रितीने वावरताना आढळून आला. त्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. अशाच प्रकारच्या दोन घटना यापूर्वीही परिसरात घडल्या होत्या.

त्यानंतर 30 मे रोजी सकाळी 7 वाजता आरोपी मुलगा मुन्शी कंपाऊंड परिसरात फिरताना पोलिसांच्या हाती लागला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने परिसरात अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले. अल्पवयीन मुलगा, त्याचे आजी-आजोबा आणि मामा पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या चोऱ्या करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा