कुरार व्हिलेजमध्ये सापडली बनावट चिनी अंडी ?


कुरार व्हिलेजमध्ये सापडली बनावट चिनी अंडी ?
SHARES

तुम्ही अंड्याचे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन असाल, तर सावधान. तुमच्या थाळीत असे अंडे येऊ शकते जे खाऊन तुमची तब्येत बिघडू शकते. हा इशारा देण्यामागचे कारण म्हणजे मालाड पूर्वेकडील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तानाजी नगरमध्ये पोलिसांनी अंड्याचे १९२ कॅरेट्स जप्त केले आहेत.

या कॅरेट्समधील अंडी चीनमधून आयात झालेली बनावट अंडी असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही अंडी पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)च्या ताब्यात तपासण्याकरीता दिली आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी नगरमधील संतोष चिकन शॉप आणि श्रीराम नगरमधील वेलकम चिकन शॉपमध्ये चीनमधून आयात केलेली बनावट अंडी असल्याची तक्रार कुरार पोलिसांकडे एका अज्ञात महिलेने रविवारी केली होती.

तक्रारदार महिलेने या दोन्ही चिकन शॉपमधून अंडी खरेदी केली होती. त्यातील अंडी बनावट असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या चिकन शॉपमध्ये धाड टाकून तेथून ५,७६० अंडी जप्त केली.


कुरार पोलिसांनी जप्त केलेल्या अंड्याचे नमुने 'एफडीए'कडे तपासणीसाठी पाठवले आहेत. 'एफडीए'कडून आलेल्या अहवालानंतरच संबंधितावर कारवाई करण्यात येईल. शिवाय 'एफडीए'चे अधिकारीही या अंड्यांची तपासणी करण्याकरीता येणार आहेत.
- विनय राठोड, डीसीपी, झोन १२



हे देखील वाचा -

आता मुंबईतही प्लास्टिक तांदूळ?

मुंबईकरांनो, बिनधास्त खा अंडी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा