PMC च्या खातेदारांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. खातेदारांची होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

PMC च्या खातेदारांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. बँकेच्या खातेदारांना आता आपल्या खात्यातून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. खातेदारांची होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. त्याचबरोबर खातेधारकांना पीएमसी बँकेच्याच एटीएममधूनही ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बँकेचे खातेदार ६ महिन्यात ५० हजार रुपये काढू शकणार आहेत. याआधी खातेदारांना ४० हजार रुपये काढता येत होते. पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. यामध्ये खातेदारांना पैसे काढण्यावरही निर्बंध होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे तणाव आलेल्या संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) या दोन खातेदारांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर एका खातेदाराने आत्महत्या केली होती. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. 

आतापर्यंत पीएमसी बँकेच्या ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे. मागील गुरूवारीच अ‍ॅड्य्रू लोबो या एका खातेदाराचा मृत्यू झाला. ज्या वेळी त्यांना रुग्णालयात नेले त्यावेळी उपचारासाठी देखील त्याच्याजवळ पैसे नव्हते. त्यांचे बँकेत २६ लाख रुपये अडकले होते.



हेही वाचा -

PMC बँक घोटाळा: उच्च न्यायालयाचे आरबीआयला 'हे' आदेश




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा