रियाला १४ दिवसांची पोलिस कोठडी

जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रियाला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रियाला १४ दिवसांची पोलिस कोठडी
SHARES

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या  चौकशीत ड्रग्जचा मुद्दा समोर आला आहे. याबाबत गेले तीन दिवस सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु होती. आता या चौकशीनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. कोरोनाची तपासणी केली गेली, ती नकारात्मक आली. त्यानंतर रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रियाला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी NIA ने तिघांना केली अटक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे. तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. एनसीबीने अनेक लोकांची चौकशी आतापर्यंत केली. रविवारपासून रिया चक्रवर्तीचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली. रविवारी साधारणपणे सात तासाच्या चौकशीनंतर एनसीबीच्या टीमने रियाला दुसऱ्या दिवशी सोमवारीही चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर मंगळवारीही रिया चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० च्या सुमारास हजर राहिली. रियाची काल केलेल्या चौकशीत तिने अंमली पदार्थ स्वतः घेणं, विकत घेणं, हातात घेणं याबद्दस स्पष्ट नकार दिला. नारकोटिक्सलाही रियाला अटक करण्यापूर्वी पक्के पुरावे जमा करायचे आहेत. यावरच तिला न्यायालयात उभं केलं जाऊ शकतं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले.चौकशी दरम्यान रियाचा सहभाग निश्चित झाल्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट केल्यानंतर तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रियाविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ सी आणि २८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली शिक्षा ६ महिने ते १० वर्षांपर्यंत असू शकते. या कायद्याच्या कलम २९ चा संदर्भही आहे, जो गुन्हेगारी कारस्थान मानला जातो. रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते, म्हणूनच तिला अटक केली गेली आहे.

हेही वाचाः- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

रियाच्या अटकेनंतर माध्यमांना उद्देशून एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा म्हणाले की, रियाच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती देण्यात आली आहे. रियाला तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेली माहिती आणि यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या विधानांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. रिया विरुद्ध एनसीबीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला १४ दिवसांची, म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा