शितप बाहेर येताच कोसळली इमारत...


शितप बाहेर येताच कोसळली इमारत...
SHARES

घाटकोपरच्या 'साईदर्शन' इमारत दुर्घटनेचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दुर्घटना घडायच्या अवघ्या ५ मिनिटांअगोदरच या दुर्घटनेला जबाबदार सुनील शितप इमारतीतून बाहेर आल्याने बचावल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

घाटकोपरमधील चार मजली 'साईदर्शन' इमारत २५ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत १७ रहिवाशांनी जीव गमावला. तर २४ हून अधिकजण जखमी झाले.

या प्रकरणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमत जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.


हे पहा सीसीटीव्ही फुटेज :   


या दुर्घटनेच्या १५ दिवसानंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजनुसार १७ रहिवाशांचा जीव घेणारा सुनील शितप दुर्घटनेतून अक्षरश: थोडक्यात बचावल्याचे स्पष्ट दिसत आहे. फुटेजमधील वेळेनुसार शितप सकाळी १० वाजून १९ मिनिटांनी इमारतीबाहेर आला आणि आपल्या गाडीत बसून निघून गेला. त्यानंतर बरोबर ५ मिनिटांनी म्हणजेच १० वाजून २४ मिनिटांनी ही इमारत कोसळली.

इमारतीत काेसळण्याच्या बेतात असतानाच काही मजूर पळून इमारतीबाहेर आले. सोबतच काही स्थानिक इमारतीत अडकलेल्या रहिवाशांनी त्वरीत बाहेर यावे म्हणून ओरडताना या फुटेजमध्ये दिसत आहे. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. अशातच इमारत कोसळताना निर्माण झालेल्या डेब्रिजच्या धुळीने सीसीटीव्ही पूर्णपणे झाकून गेला.

या सीसीटीव्ही फुटेजमुळे शितपला इमारत कोसळू शकते, याचा अंदाज आला होता का? आला असेल तर त्याने इमारतीतील इतर रहिवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या शितप पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.



हे देखील वाचा -

अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा