मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीवर स्थगिती

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला टाडा कोर्टाचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सीबीआयला देखील कोर्टाने नोटीस पाठवली आहे. १४ मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीवर स्थगिती
SHARES

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला टाडा कोर्टाचे रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सीबीआयला देखील कोर्टाने नोटीस पाठवली आहे. १४ मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.

१२ मार्च १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सात सप्टेंबरला मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चंट आणि फिरोझ खानला फाशीची शिक्षा सुनावली होती. काही जणांना ट्रेनिंगसाठी भारतातून पाकिस्तानात पाठवल्याचा आरोप ताहिरवर होता.

याच प्रकरणात अबू सालेम आणि करीमुल्ला खानला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर, पाचवा आरोपी रियाज सिद्दीकीला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.


म्हणून अबू सालेम वाचला...

१९९३ मुंबई ब्लास्टच्या मुख्य आरोपींपैकी एक असलेला अबू सालेम मात्र यावेळी फाशीच्या शिक्षेपासून वाचला होता. अबू सालेमला पोर्तुगाल मधून प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्यावेळी पोर्तुगालशी झालेल्या करारामुळे भारतीय तपास यंत्रणांचे हात बांधले गेले होते.


१२ मार्च १९९३ च्या कटू आठवणी

१२ मार्च १९९३ साली मुंबईत एका झालेल्या १२ स्फोटांनी मुंबई हादरली होती. या स्फोटात २५७ निष्पापांचा बळी गेला होता, तर ७०० हून अधिक मुंबईकर जखमी झाले होते. देशात आरडीएक्स स्फोटकांचा वापर करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ होती.

ब्लास्टच्या पहिल्या केसमध्ये तब्बल १०० लोकांना दोषी ठरवण्यात आले होते. ज्यात संजय दत्तचा देखील समावेश होता. ज्याला एके 47 बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती, तर याकूब मेमनला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फासावर लटकवण्यात आलं होतं. मात्र, याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह अन्य २७ आरोपी अद्याप फरार आहेत.हेही वाचा

मालमत्ता लिलावाने दाऊद भडकला, १९९३ सारख्या ब्लास्टची दिली धमकी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा