सुशांतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे, उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले

बिहारच्या पोलिसांना मुंबईत क्वारनटाईन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने याबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारला पत्र लिहित या प्रकरणाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती.

सुशांतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे, उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडे सोपवण्यात आली आहे. बिहारच्या पोलिसांना मुंबईत क्वारनटाईन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने याबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारला पत्र लिहित या प्रकरणाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारने ही माहीती न्यायालयात दिली.

 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतचे वडिल केके सिंह यांनी बिहारमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले. बिहार पोलिसांनी अवघ्या चार दिवसात सुशांतची इंतभूत माहती मिळवली. त्यात सुशांतच्या बँकेचे डिटेल्स खूप महत्वाचे ठरले. त्या बँक डिटेल्सच्या आधारे सुशांतच्या खात्यातून रियाच्या बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराद्वारे रियावर पोलिसांचा संशय बळावला. रियाच्या चौकशीसाठीबिहार पोलिस तिच्या घगरी देखील गेले. मात्र ती घरात नव्हती. या प्रकणाच्या तपासासाठी बिहार सरकारने पोलिस अधिक्षक पाठवल्यानंतर तो मुंबईत आल्यानंतर त्याला क्वारंनटाईन करण्यात आले आणि वादची ठिणगी पडली. या दरम्यान रियाने सुप्रीम कोर्टात याचिका करत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा अशी याचिका केली होती.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११२५ नवे रुग्ण, दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू

त्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले. त्यावेळी केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारनं या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारनं बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार असल्याचे स्पष्ट केले. सुशांत सिंह यांच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्यात बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी कायम ठेवण्याचीही कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. कोर्टानं दोन्ही पक्षांचं म्हणनं नोंदवून घेतलं आहे. याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

हेही वाचाः- मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा