अटकेत असलेल्या भावाला पाहून रियाला अश्रू अनावर

मागील दोन दिवसांपासून रियाची एनसीबीकडून चौकशी सुरू होती. या पूर्वी या प्रकरणात तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सुशांत सावंत याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे

अटकेत असलेल्या भावाला पाहून रियाला अश्रू अनावर
SHARES

अभिनेता सुशांतसिंह राजपूतला अंमली पदार्थ पुरवल्याच्या आरोपाखाली ३ दिवस चौकशी केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने मंगळवारी अटक केली. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज नामंजूर करत तिला १४ दिवसांच्या ज्युडिशीएल कस्टडी सुनावली. न्यायालयातून रियाला एनसीबीच्या तुरूंगात हलवले. त्या ठिकाणी तुरूंगात असलेला भाऊ शौवक चक्रवर्तीला पाहून रियाचे अश्रू अनावर झाले. शौविकला पाहून रिया ढसाढसा रडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील दोन दिवसांपासून रियाची एनसीबीकडून चौकशी सुरू होती. या पूर्वी या प्रकरणात तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सुशांत सावंत याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे. तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. एनसीबीने अनेक लोकांची चौकशी आतापर्यंत केली. रविवारपासून रिया चक्रवर्तीचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली. रविवारी साधारणपणे सात तासाच्या चौकशीनंतर एनसीबीच्या टीमने रियाला दुसऱ्या दिवशी सोमवारीही चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर मंगळवारीही रिया चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० च्या सुमारास हजर राहिली. रियाची काल केलेल्या चौकशीत तिने अंमली पदार्थ स्वतः घेणं, विकत घेणं, हातात घेणं याबद्दस स्पष्ट नकार दिला. नारकोटिक्सलाही रियाला अटक करण्यापूर्वी पक्के पुरावे जमा करायचे आहेत. यावरच तिला न्यायालयात उभं केलं जाऊ शकतं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले.चौकशी दरम्यान रियाचा सहभाग निश्चित झाल्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट केल्यानंतर तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रियाविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ सी आणि २८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली शिक्षा ६ महिने ते १० वर्षांपर्यंत असू शकते. या कायद्याच्या कलम २९ चा संदर्भही आहे, जो गुन्हेगारी कारस्थान मानला जातो. रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते, म्हणूनच तिला अटक केली गेली आहे.

हेही वाचाः- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

रियाच्या अटकेनंतर माध्यमांना उद्देशून एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा म्हणाले की, रियाच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती देण्यात आली आहे. रियाला तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेली माहिती आणि यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या विधानांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. रिया विरुद्ध एनसीबीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला १४ दिवसांची, म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला तुरुंगात आणले. त्या ठिकाणी शौविकला पाहून तिचे अश्रू अनावर झाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा