गाडी खरेदी-विक्री केल्यानंतर १५ दिवसात ती नावावर करा, अन्यथा होऊ शकते कायदेशी कारवाई

या व्यवहारात कुठेही कागदी व्यवहार न झाल्याने आरटीओ नियमानुसार गाडीच्या मूळ मालकाच्या अडचणी वाढ झाली आहे.

गाडी खरेदी-विक्री केल्यानंतर १५ दिवसात ती नावावर करा, अन्यथा होऊ शकते कायदेशी कारवाई
SHARES

मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरात घडलेल्या अपघातातून अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या अपघातात आरोपीने चालवत असलेली गाडी एका महिलेची होती. तिने लाॅकडाऊनपूर्वी ती विकली, ज्या दोघांना ती विकली, त्यानी ती पुढे एका महिन्यात आरोपीला विकली. मात्र या व्यवहारात कुठेही कागदी व्यवहार न झाल्याने आरटीओ नियमानुसार गाडीच्या मूळ मालकाच्या अडचणी वाढ झाली आहे.  याशिवाय वाहतुक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला(आरटीओ) आरोपी समीर अली सय्यद ऊर्फ डिग्गी(४५) याचा चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

हेही वाचाः- मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालक आरोपी सय्यद समीर अली उर्फ डिग्गीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. कार चालवताना अचानक त्याला फिट आल्याने हा अपघात घडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी  विरोधात ३०४(२),२७९,३३७, ४२७, ३०८ भादविसह मोटार वाहन कायदा कलम १८३ व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात ही गाडी लाॅकडाऊनपूर्वी सय्यदने अवघ्या २८ हजारांना तोफिक ताज आणि सनी राजपूत यांच्याकडून घेतली होती. या दोघांनी ही गाडी ‘ओएलएक्स’वर परळ परिसरात राहणाऱ्या ज्योती बबारीया या महिलेकडून ३२ हजार रुपयांना घेतली होती. अवघ्या काही महिन्या दोन वेळा या गाडीचा खरेदी विक्री व्यवहार झाला. मात्र तोफिक आणि सनीने ही गाडी स्वतःच्या नावावर केली नाही. तर डिग्गीने त्या दोघांकडूनही गाडी खरेदी केल्यानंतर गाडी स्वत:च्या नावावर करून घेतली नाही. त्यामुळे अपघात घडल्यानंतर आरटीओत गाडीचे मूळ मालक पासले असता. ज्योती बबारीया यांचे नाव पुढे आले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी ज्योतीला चौकशीसाठी बोलावले असता. त्याच्या पायाखालची जमिन सरकली. मात्र या प्रकरणात डिग्गी याला अपघात घडला त्यावेळी रंगेहाथ पकडल्याने पोलिसांनी ज्योति यांचा जबाब घेऊन सोडले. मात्र आरटीओ नियमानुसार गाडी खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर १५ दिवसात गाडी संबधित मालकाच्या नावावर करणे अपेक्षित असते. तसे न केल्यास संबधित व्यक्तीकडून कुठलाही गुन्हा घडल्यास इतरांनाही त्या प्रकरणात त्रास होऊ शकतो.   

हेही वाचाः- IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

दरम्यान या प्रकरणात आरोपी डिग्गीची मानसिक स्थिती व इतर बारकावे प्राप्त करण्यासाठी जे.जे. रुग्णालयात त्याची सायकोलॉजिकल चाचणी करण्यात येत आहे.२ सप्टेंबरपासून ही चाचणी सुरू करण्यात आली असून ७ सप्टेंबरपर्यंत ही चाचणी चालणार आहे. याशिवाय वाहतुक पोलिस याप्रकरणी अहवाल तयार करत असून ते समीरचा चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आरटीओ विभागाकडे विनंती करणार आहेत. यापूर्वी १२ मेला आरोपीने जे.जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीतही अपघात केला होता. त्यात आरोपीने कारने दुस-या कारला धडक दिली होती. या अपघातात महिलाही जखमी झाली होती. दोन अपघाताच्या पार्श्वभूमिवर आरोपी कार चालवण्यास पात्र वाटत नसल्यामुळे परवाना रद्द करण्यासाठी विनंती कण्या येणार आहे. त्यासाठी आरोपीची सायकोलॉजीकल चाचणीही करण्यात येत आहे.  क्रॉफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री ९ च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारनेदिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जमखी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा