शिवसेना नेते नांदगावकरांच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांना अटक

फिर्यादीने स्वतःचा नंबर टाकला आणि नितीन नांदगावकर यांच्याकडे मदतीची मागणी केली. मात्र फेसबुक पेज हे सार्वजनिक असल्यामुळे याचा फायदा या दोन आरोपींनी घेण्याचं ठरवलं.

शिवसेना नेते नांदगावकरांच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांना अटक
SHARES

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  नितीन नांदगावकर यांच्या ऑफिस मधून बोलतोय आम्हाला तुमची मदत करायची आहे असं सांगून या दोन्ही आरोपींनी फिर्यादी कडून जवळपास दीड लाख रुपये उकळले होते त्यानंतर फोन बंद करून पोबारा केला. दोन्ही आरोपींना मुंबई आणि सातारा मधून अटक करण्यात आलेली आहे.

हेही वाचा:- बाॅलिवूडमधील वादावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

घर देतो असं सांगून एका बिल्डरने फिर्यादी कडून लाखो रुपये घेतले होते मात्र बरेच दिवस झाले तरी सुद्धा घर आणि पैसे दोन्ही गोष्टी मिळत नसल्यामुळे फिर्यादीने नितीन नांदगावकर यांची मदत घेण्याचे ठरवले त्यासाठी फेसबुक वरील नितीन नांदगावकर फॅन क्लब या पेजवर जाऊन फिर्यादीने स्वतःचा नंबर टाकला आणि नितीन नांदगावकर यांच्याकडे मदतीची मागणी केली. मात्र फेसबुक पेज हे सार्वजनिक असल्यामुळे याचा फायदा या दोन आरोपींनी घेण्याचं ठरवलं. आरोपींनी फिर्यादीस फोन केला आणि नितीन नांदगावकर यांच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगून बिल्डर कडून पैसे काढून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमचा वाटा द्यावा लागेल असं सांगून जवळपास दीड लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले.

हेही वाचा:-अखेर उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, केला शिवसेनेत अधिकृत प्रवेश

  फिर्यादीची फसवणूक झाली हे लक्षात येताच या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना मुंबई आणि साताऱ्यातून अटक करण्यात आलेली आहे..सुरज निकम (२४) आणि रोहित कांबळे (१९) अशी या अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.. त्यामुळे सोशल मीडियातील गैरव्यवहाराला बळी न पडण्याचे आवाहन आता पोलिसांनी केलेल आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय