काय सांगता! न्यायालयातून विजय मल्ल्याची कागदपत्र गायब

मल्ल्याच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे फाईलमधून गायब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी तहकूब करावी लागली

काय सांगता! न्यायालयातून विजय मल्ल्याची कागदपत्र गायब
SHARES

भारतातल्या बॅकांना कोट्यावधी रुपयांना चुना लावून परदेशात बिनदिक्कत फिरणारा आरोपी विजय मल्ल्याच्या खटल्यातील महत्वाची कागदपत्रे न्यायालयातून चोरीला गेल्याचे पुढे आले आहे. त्याच्या पुनविचार याचिकेवर २० आॅगस्ट रोजी सुनावणी करावी लागली.

हेही वाचाः- VIVO सोबतचा करार मोडला, बीसीआयने केली घोषणा

मल्ल्याला २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते, मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध जाऊन आपली संपत्ती आपल्या कुटुंबात हस्तांतरित केली. या संबधित एक कागदपत्र सध्या मिळत नसून ते त्या फाईलमधून गायब आहे. मागील सुनावणीत कोर्टाने मे २०१७ च्या आदेशाविरूद्ध मल्ल्याचे अपील कोर्टासमोर का लिस्ट केले गेले नाही. याबाबत स्वत: च्या नोंदणीतून स्पष्टीकरण मागितले होते. कोर्टाने रेजिस्ट्रीकडे फाइल हातळणाऱ्यांची माहितीही विचारली. विजय मल्ल्याची याचिका उशिराने लिस्ट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ साली दिलेल्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आता सुनावणीस आली होती. ही याचिका आतापर्यंत का न्यायालयासमोर आली नव्हती अशी विचारणा रजिस्ट्रीकडे करण्यात आली होती. तसेच यावर दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते.

हेही वाचाः- “ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”

मल्ल्या २ मार्च २०१६ रोजी छुप्या पद्धतीने भारतातून पळाला. स्कॉटलंड यार्ड, यूके पोलिसांनी त्याला १८ एप्रिल २०१७ रोजी अटक केली होती. मात्र लंडनच्या कोर्टाने काही तासातच त्याला जामिनावर सोडले. मल्ल्याला भारत प्रत्यार्पित करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. मल्ल्याची भारतातील १७ बँकांवर ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा