शरीरसुख नाकारल्याने महिलेची हत्या, सुरक्षारक्षकासह 3 जण अटकेत

Aarey Colony
शरीरसुख नाकारल्याने महिलेची हत्या, सुरक्षारक्षकासह 3 जण अटकेत
शरीरसुख नाकारल्याने महिलेची हत्या, सुरक्षारक्षकासह 3 जण अटकेत
शरीरसुख नाकारल्याने महिलेची हत्या, सुरक्षारक्षकासह 3 जण अटकेत
See all
मुंबई  -  

शरीरसुखाच्या मागणी मान्य न केल्याने राजेंद्र सिंग नावाच्या सुरक्षारक्षकाने एका महिलेची हत्या केल्याची घटना आरे कॉलनीमध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षारक्षकासह 3 आरोपींना अटक केली आहे.

सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता आरे कॉलनी येथील पिकनिक पॉईंटजवळील कोंबडपाडा येथे एका महिलेचा मृतदेह पुठ्ठ्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला होता. महिलेच्या हातातून रक्त येत होते, तर तिच्या डोक्यावर देखील जखमेच्या खुणा होत्या.


पोलिसांच्या चौकशीनंतर आरोपींना अटक

पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेचे नाव शारदाबाई होटकर असून ती बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. आणखी चौकशी केली असता ही महिला एमआयडीसी येथील ऑप्शन प्रायमो मॉलमधील ऑफिसमध्ये सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली.


3 महिन्यांपासून महिलेला छळत होता

याच मॉलमध्ये काम करणारा सुरक्षारक्षक राजेंद्र सिंग (25) हा या महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. तीन महिन्यांपासून हा राजेंद्र त्या महिलेला त्रास देत होता. एवढेच नाही तर, हत्येच्या दिवशी महिलेला शेवटचा फोन देखील याच राजेंद्रने केल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.


असा झाला प्रकरणाचा उलगडा

सुरुवातीला महिला ही गोडाऊनमध्ये पाय घसरून पडल्याचे या राजेंद्रने पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी आपला इंगा दाखवल्यावर त्याने आपणच हत्या केल्याची काबुली दिली. हत्येनंतर राजेंद्र आणि राम बाबू सिंग (26), अनिल कुमार सिंग (24) आणि रोहित सिंग (22) नावाच्या या साथीदारांनी तिचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकला आणि आरे कॉलनीच्या जंगलात फेकून दिला.

या प्रकरणी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली चौघांना अटक केल्याची माहिती झोन 12 चे डीसीपी विनयकुमार राठोड यांनी दिली.हेही वाचा -

देहविक्री करणाऱ्या महिलेची फक्त 600 रुपयांसाठी हत्या

मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.