आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या तुळशीचं महत्त्व


  • आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या तुळशीचं महत्त्व
  • आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या तुळशीचं महत्त्व
SHARE

आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर म्हणजे माहेरघर. वारकरी विठ्ठल-रखुमाईला जेवढं महत्त्व देतात तेवढंच मानाचं स्थान ते तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावनालाही देतात. पण वारकरी संप्रदायासाठी तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावनाला एवढं महत्त्व का आहे? हे आम्ही सांगणार आहोत.तुळस सात्विकतेचं प्रतिक

तुळशीच्या दर्शनानं सुख-समृद्धी प्राप्त होतं. ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध असते. तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी तर राहतंच. शिवाय तुळशीच्या स्पर्शामुळे उर्जा मिळते. आयुष्यातील कर्तव्य कर्म करताना भागवंताचं विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करतात.तुका म्हणे...

तुळसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
तेथ वसती यम। किंकर आ आहे म्हणोनि
तुलसीवृदांवन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी
तुलसीवृदांवन जे करिता प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे

याचा अर्थ ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावं ज्यांच्या घरात तुळस आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जो व्यक्ती तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचं स्मरण करतो तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.हेही वाचा

मेकिंग वारी ग्लोबल


संबंधित विषय
ताज्या बातम्या