Advertisement

वडाळ्यात 'विठ्ठल' नामाचा गजर


वडाळ्यात 'विठ्ठल' नामाचा गजर
SHARES

प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. मुंबई, उपनगरातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे दाखल झाले होते. टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या गजराने वडाळ्यातील कात्रक रोड गजबजून गेला.



कानाकोपऱ्यातून दिंडी दाखल

मागील 400 वर्षांपासून संतांचा वारसा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करायला सुरूवात केली. आषाढीत ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, असे वारकरी वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आवर्जून येतात. यंदाही मोठ्या संख्येने वारकरी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून दिंडी घेऊन आल्याचे चित्र होते.



भाविकांची उत्तम सोय

लाखो भाविकांची उत्तम सोय विठ्ठल मंदिर प्रशासनातर्फे ठेवण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसही तैनात करण्यात आले होते. भाविकांसमवेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी दर्शन घेतल्याचा फोटो विनोद तावडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.



दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर शाळेच्या विद्यार्थांनी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसोबत दिंडी काढली. यावेळी विद्यार्थांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.



घाटकोपरमध्ये किर्तनाचे आयोजन

आषाढी एकादशी निमित्ताने घाटकोपर पूर्वेकडील श्री रामदूत हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे दोन दिवसीय किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 4 ते 5 जुलै असा दोन दिवस रंगणार आहे.



या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार सकाळी 10 ते 12 यावेळीत हरि भक्त महाराज सकाराम गुडेकर यांच्या भजनाने झाली. बुधवारी 5 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजता ह.भ.प. गुणाजी महाराज भोसले यांच्या किर्तनाने कार्यक्रमाचा शेवट होईल.

संतांनी रचलेले अंभग नव्या पिढीच्या कानी पडावेत, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे रामदूत हनुमान मंदिर ट्रस्टचे पुजारी ह.भ.प. रामचंद्र महाराज जगताप यांनी सांगितले.

तर, संतांनी रचलेले अभंग ऐकून तरुण पिढीचे नक्कीच प्रबोधन होईल, असे मत दिलीप पाटील या भाविकाने व्यक्त केले.




हे देखील वाचा -

आषाढीला करा जीएसटी फ्री 'पोटोबा'!

मुंबईतलं 'पंढरपूर'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा