Advertisement

माणिक मुंडे यांच्या पुस्तकांचे अनावरण


माणिक मुंडे यांच्या पुस्तकांचे अनावरण
SHARES

दादर - रविंद्र नाट्य मंदिरात शंकराचार्य महाराज यांच्या वतीने मराठी प्रख्यात लेखक माणिक मुंडे यांच्या पुस्तक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 'आधी रात जगाने आया हूँ आणि गाईन ओवी गाईन नाम' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी भाजप अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेता प्रविण दरेकर, भाजप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अमरजित मिश्र, हरिद्वारचे शंकराचार्य, बौद्ध धर्मगुरू मास्टर कर्मा तानपाई गियालेशन, जैनमुनी पदमा सागर उपस्थित होते. पहिल्यांदाच मराठी व्यक्तीला हिंदी पुस्तक लिहिल्याबद्दल वाणी प्रकाशनच्या वतीने मानधन स्वरूपात 10 लाखांचा धनादेश देण्यात आला असून, यातील 1 लाख रुपयांचा धनादेश माणिक मुंडे यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत निधीमध्ये जमा करण्यासाठी गडकरी यांच्याकडे सुपूर्द केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा