Advertisement

विद्यापीठ, महाविद्यालयात योग दिवस साजरा करा - राज्यपाल


विद्यापीठ, महाविद्यालयात योग दिवस साजरा करा - राज्यपाल
SHARES

येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात असून मुंबई विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयातही हा दिवस साजरा करण्याची सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयात २१ जूनला योग दिवस साजरा करण्यात यावा, तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला किमान १ तास तरी योग शिकवावा असे आदेश दिले होते.


अहवाल पाठवण्याचा अादेश

विद्यापीठ तसच महाविद्यालयात योग दिवस साजरा करताना सर्व सामायिक योग प्रणाली (कॉमन योग प्रोटोकॉल) तसंच योग प्रार्थनेचा समावेश करण्यात यावा, तसंच यावेळी प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करावं. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं आयोजन केवळ एका दिवसासाठी न करता नियमितपणे करून त्याकरिता विद्यापीठांनी कृती आराखडा तयार करावा, अशी देखील सूचना राज्यपालांनी केली आहे. 

याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यापीठ व महाविद्यालयांनी घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड करावी. आणि त्यासंदर्भातील काही छायाचित्रे व अहवाल त्याच दिवशी म्हणजे २१ जूनला राजभवनाकडे पाठविण्याचा अादेशही राज्यपालांनी विद्यापीठांना दिला अाहे.



हेही वाचा -

मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेश राज्यस्तरीय कोट्यानुसार

अकरावी हेल्पलाइनलाच हवी हेल्प, हेल्पलाइन नंबरच चुकीचे


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा