Advertisement

आयआयटी मुंबई कमाईतही 'नंबर वन'

गेल्या ३ वर्षांपासून देशातल्या आयआयटी संस्थामधून मुंबई आयआयटी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

आयआयटी मुंबई कमाईतही 'नंबर वन'
SHARES

रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसंच विविध पेटंटच्या माध्यमातून महसूल कमावण्याच्या बाबतीत मुंबई आयआयटी, पवई यंदाही नंबर वन ठरलं आहे. गेल्या ३ वर्षांपासून देशातल्या आयआयटी संस्थामधून मुंबई आयआयटी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.


कुणाचा कितवा क्रमांक?

मुंबई आयआयटीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रास आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आयआयटी विराजमान आहे. मुंबई आयआयटीने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १७ कोटी ९९ लाख रुपये कमावले आहेत. तर आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये १७.११ कोटी रुपये आणि २०१५-१६ मध्ये १०.६५ कोटी रुपये कमावले होते.


किती कमाई?

तर आयआयटी मद्रासने गेल्या ३ वर्षांत अनुक्रमे ११.६७ कोटी रुपये, १०.८७ कोटी आणि ७.१५ कोटी रुपये कमावले आहेत. याचप्रमाणे आयआयटी दिल्लीने अनुक्रमे १०.६१ कोटी रुपये, ८.८४ कोटी आणि ७.०३ कोटी रुपये कमावले आहेत. या संस्थांनी ही कमाई संशोधन, अविष्कार, सल्ला आणि पेटंटच्या माध्यमातून केली आहे.



हेही वाचा-

आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

आयआयटी मुंबईत लवकरच वैद्यकीय शिक्षण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा