Advertisement

आयआयटी टेकफेस्टमध्ये अँड्राॅइड-यू, फूटबाॅल खेळणारा रोबो हिट

यंदाच्या आयआयटी टेकफेस्टची 'टाइमलेस लॅप्स' ही थीम ठेवण्यात आली आहे. या थीमनुसार पवईच्या केव्ही मैदानावर जपानचा हिरोशी इशिगुरो लॅबने बनवलेला अँड्राॅइड-यू, जर्मनीचा फुटबॉल खेळणारा बी-ह्यूमन, हंगेरीचा डॅनियल आणि स्वीडनचा फरहात या रोबोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

आयआयटी टेकफेस्टमध्ये अँड्राॅइड-यू, फूटबाॅल खेळणारा रोबो हिट
SHARES

देशातील सर्वात मोठा तंत्रज्ञान उत्सव म्हणून ख्याती असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये विविध विज्ञान-तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार पाहण्यासाठी पहिल्या दिवशी ३० हजारपेक्षा जास्त जणांनी हजेरी लावली. शनिवारी १५ डिसेंबर रोजी या फेस्टचा दुसरा दिवस असून आजही विद्यार्थ्यांनी केलेलं विविध अविष्कार लोकांना पाहता येणार आहे.

१४ ते १६ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या टेकफेस्टचं उदघाटन जागतिक बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये सुरु झाला टेक्नोविष्कार.


'टाइमलेस लॅप्स' थीम

यंदाच्या आयआयटी टेकफेस्टची 'टाइमलेस लॅप्स' ही थीम ठेवण्यात आली आहे. या थीमनुसार पवईच्या केव्ही मैदानावर जपानचा हिरोशी इशिगुरो लॅबने बनवलेला अँड्राॅइड-यू, जर्मनीचा फुटबॉल खेळणारा बी-ह्यूमन, हंगेरीचा डॅनियल आणि स्वीडनचा फरहात या रोबोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्त जसच्या तसं आपल्या चेहऱ्यावरही प्रकट करणारा फरहात रोबोही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे हा रोबो फक्त बोलण्यासोबत माणसासारखं कामही करू शकतो.


रोबोचं आकर्षण

जपानी तरुणीसारखं हुबेहूब दिसणारा अँड्राॅइड-यू हा रोबो देखील हटके आहे. यंदाच्या टेकफेस्टमध्ये आर्मीतर्फे विविध शस्त्र व त्याची माहिती दाखवण्यात येत आहे. त्यामुळे हा टेकफेस्ट केवळ मनोरंजन आणि स्पर्धांसाठीच मर्यादित राहणारा नसून येणाऱ्या पिढीला उद्याचे संशोधक म्हणून घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.



हेही वाचा-

१४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आयआयटीचा टेकफेस्ट

शिक्षणात मानवी मूल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा