Advertisement

CBSE दहावीचा निकाल आज

CBSE दहावीचा निकाल मंगळवारी २९ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येईल. संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा सीबीएसईद्वारे करण्यात आली आहे. देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

CBSE दहावीचा निकाल आज
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज म्हणजे मंगळवारी २९ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येईल. संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा सीबीएसईद्वारे करण्यात आली आहे. देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.


बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली. 'सीबीएसई'च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. यंदाच्या शैक्षणिक वर्षात 'सीबीएसई'ने सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन (सीसीई) पद्धत बदलून पुन्हा बोर्ड पद्धतीने परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.


पेपरफुटी आणि फेरपरीक्षा

यंदाची बारावीप्रमाणे दहावीची परीक्षा काहीशा गोंधळातच पार पडली. दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि झारखंड येथे गणिताचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या विषयाची परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही, यावर वादंग झाल्यानंतर अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही परीक्षा पुन्हा न घेण्याचाच निर्णय घेतला होता.


येथे पाहा निकाल

सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल cbse.nic.in , cbseresults.nic.in आणि results.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल संध्याकाळी चार वाजेच्यानंतर पाहता येईल. आयव्हीआर आणि एसएमएसच्या माध्यमातूनही हा निकाल जाणून घेता येईल. त्याचबरोबर संबंधित शाळांच्या वेबसाइटवरही हा निकाल पाहता येईल, असं 'सीबीएसई'तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

सेट परीक्षेचा निकाल जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा