Advertisement

मूल्यांकनाचे सर्व काम मेरीट ट्रॅक कंपनीकडेच!


मूल्यांकनाचे सर्व काम मेरीट ट्रॅक कंपनीकडेच!
SHARES

विद्यापीठाने ऑनलाईन मुल्यांकनामुळे निकालात झालेला गोंधळ पुन्हा होऊ नये, यासाठी विद्यापीठाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधील महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन मूल्यांकनासाठी एकाच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणे. या वेळी केवळ मेरीट ट्रॅक या एकाच कंपनीला कॉन्ट्रॅक देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

मे २०१७ मधील ऑनलाईन मूल्यांकनासाठी दोन वेगळ्या कंपन्यांकडे विद्यापीठाने काम दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूल्यांकनात गोंधळ झाला. उत्तरपत्रिका गहाळ होणे, चुकीचे गुण दिले जाणे अशा अनेक चुका यावेळी झाल्या. या चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने हे काम एकाच कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या चुका टाळण्यात येतील, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.

परीक्षा सुरू होण्याअगोदरच मेरीट ट्रॅक कंपनीकडे सगळी माहिती पोहोचवण्यात आली आहे. चौदा हजार प्राध्यापकांविषयी माहिती घेऊन ती मेरीट ट्रॅक कंपनीकडे पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका स्कॅनिंगसाठी लागणाऱ्या मशिनची संख्याही वाढवण्यात आली आहे.

त्याचबबरोबर मे महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल लागलेले नाहीत, ती कामे आता करत असलेल्या दोन्ही कपन्यांकडेच आहेत. मात्र, यापुढे येणाऱ्या परिक्षांचे मूल्यांकन केवळ मेरीट ट्रॅक कंपनी करणार आहे.



हेही वाचा

सरासरी गुण कोणत्या आधारावर? - माजी कुलगुरू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा