Advertisement

ऑनलाईन असेसमेंटवर प्राध्यापक वर्ग नाराज


ऑनलाईन असेसमेंटवर प्राध्यापक वर्ग नाराज
SHARES

विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालानंतर न्यायालयाने ऑनलाईन असेसमेंट ही पद्धत योग्य असल्याचेच म्हटले आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता पुढील परीक्षांसाठीही अॉनलाईन असेसमेंटचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राध्यापक मात्र नाराज आहेत. एकदा ऑनलाईन असेसमेंटनंतर गोंधळ झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन असेसमेंट का? असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.


प्रायेगिक तत्त्वावर अवलंब करावा

'ऑनलाईन असेसमेंट ही पध्दत योग्यच आहे. मात्र याचे प्रशिक्षण प्राध्यापकांना दया,' असे न्यायलयाने विद्यापीठाला सांगितले होते. यानंतर 'ऑनलाईन पद्धतीचा वापर टप्प्याटप्याने व्हावा', असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. यावेळी ऑनलाईन असेसमेंट पद्धती सर्व परीक्षांसाठी वापरल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. सर्व निकाल लागायला तब्बल ४ महिने गेले. त्यामुळे पुन्हा असा गोंधळ होऊ नये, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर करावा, अशी मागणी प्राध्यापक करत आहेत.

आर्ट्स आणि सायन्स शाखेच्या तुलनेत कॉमर्स शाखा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बीकॉम वगळता ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या कमी आहे, अशा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन असेसमेंटचा वापर करावा. येत्या परीक्षांमध्येे ऑनलाईन असेसमेंचा वापर होऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका प्राध्यापकांनी मांडली आहे.


कंपनीवर कारवाई कधी?

ऑनलाईन असेसमेंटचे काम २०१७ साली 'मेरीट लिस्ट' या कंपनीला देण्यात आले होते. मात्र काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्याचबरोबर उत्तरपत्रिकांचे चुकीच्या पद्धतीने स्कॅनिंग, उत्तरपत्रिकांचे कोडिंग-डीकोडिंगबाबत उशीराने घेतलेले निर्णय, विद्यार्थी संख्येचा विचार न करता केलेले काम, त्यामुळे रखडलेले निकाल, गहाळ उत्तरपत्रिका यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


प्राध्यापकांचा विचार करा

ऑनलाईन असेसमेंट या पद्धतीचा अवलंब करताना प्राध्यापकांचा विचार व्हायला हवा. अनेक प्राध्यापक हे निवृत्त होणाच्या मार्गावर आहेत. त्यांना या वयात इतक्या जलद गतीने टेक्निकल गोष्टींचा अवलंब करणे कठीण आहे. त्यामुळे ऑनलाईन असेसमेंटचा भार त्यांच्यावर देऊ नये.

अमोल मातोले, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना



हेही वाचा

निकाल लागले तरी, विद्यार्थ्यांवर टागंती तलवार कायम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा